Delhi Rain Updates : दिल्लीत जीवघेणा पाऊस! अंडरपासमध्ये बुडून तिघांचा मृत्यू, पावसामुळे आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू

Delhi Rain Updates : दिल्लीत जीवघेणा पाऊस! अंडरपासमध्ये बुडून तिघांचा मृत्यू, पावसामुळे आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू

Published on

नवी दिल्लीः मागच्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने अपघात होत आहेत. शनिवारी सिराजपूरजवळील अंडरपासमध्ये बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पावसामुळे १२ जणांचा दिल्लीमध्ये मृत्यू झालाय.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये पुढचे चार दिवस पाऊस थांबणार नाही. हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे सखल भागामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Delhi Rain Updates : दिल्लीत जीवघेणा पाऊस! अंडरपासमध्ये बुडून तिघांचा मृत्यू, पावसामुळे आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
Raj Thackeray : ''भारतात लोकशाही नाही'' राज ठाकरेंनी केली अमेरिकेशी तुलना; म्हणाले, ..तरीही त्यांच्या चित्रपटांना त्रास झाला नाही

दिल्लीतल्या ओखला औद्योगिक परिसरामध्ये पाण्यात बुडून तिसऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती स्कुटर चालवत होती. ओखला अंडरपासमध्ये बुडून त्याचा मृत्यू झाला. बेशुद्धावस्थेत आढळून आल्यानंतर त्याला उपचारासाठी एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आलेलं होतं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

Delhi Rain Updates : दिल्लीत जीवघेणा पाऊस! अंडरपासमध्ये बुडून तिघांचा मृत्यू, पावसामुळे आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
Andheri RTO Scam: "RTO मधून तब्बल ७६ हजार बनावट ड्रायव्हिंग लायसन्स जारी"; वडेट्टीवारांचा सभागृहात गंभीर आरोप

दरम्यान, दिल्लीमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर हवामान खात्याने पुढील चार दिवस दिल्ली एनसीआर भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. रविवार आणि सोमवारी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने दिल्लीकरांनी कामशिवाय घराबाहेर पडू नये, असं आवाहन करण्यात आलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com