

delhi blast
esakal
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशन क्रमांक १ लगत पार्क केलेल्या ह्युंदाई आय२० कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटाने राजधानी हादरली. हे दहशतवादी कृत्य असल्याचे तपासात उघड झाले आहे. कारमधील जळालेल्या अवशेषांपैकी ड्रायव्हरच्या जागेवर सापडलेल्या एका अज्ञात शरीराच्या भागांची ओळख पटली असून, ते काश्मीरचे कथित आत्मघाती बॉम्बर डॉ. उमर यांचे असल्याचे प्राथमिक निष्कर्ष आहेत.