Delhi Red Fort blast Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घटनास्थळी पोहचले ; जखमींचीही भेट घेणार

Delhi blast Latest News : दिल्लीतील मेट्रो परिसरात उभ्या असणाऱ्या एका गाडीत भीषण स्फोट झाला, अन्य तीन गाड्या देखील पेटल्या.
Delhi  Red Fort blast Live Update :  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घटनास्थळी पोहचले ; जखमींचीही भेट घेणार

esakal

Breaking News: Explosion Rocks Delhi’s Red Fort Area: राजधानी दिल्ली आज सायंकाळी स्फोटाने हादरली. लाल किल्ला परिसरात एक भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : अमित शहा घटनास्थळी पोहचणार

गृहमंत्री अमित शहा थोड्यावेळात स्फोट घडला त्या ठिकाणी जाणार आहेत. शिवाय, रूग्णालयात जाऊन जखमींचीही भेट घेणार आहेत.

Delhi blast : दिल्ली स्फोटातील मृतांचा आकडा १३ वर पोहचला

दिल्लीत लाल किल्ला परिसरात झालेल्या या स्फोटातील मृतांचा आकडा वाढला आहे. सध्या प्राप्त माहितीनुसार १३ जणांचा मृत्यू झालेला आहे.

CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना सतर्कतेचे आदेश

हरियाणाच्या फरीदाबाद येथून ३६० किलो संभाव्य अमोनियम नायट्रेट जप्त झाल्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी वर्षा येथे सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि एकूण सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. आता, दिल्लीतील घटनेनंतर, त्यांनी पुन्हा एकदा पोलिसांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व एजन्सींना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 Delhi Explosion : दहशतवादी हल्ला असल्याची सूत्रांची माहिती

राजधानी दिल्लीतील हा स्फोट दहशतवादी हल्ला असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने पोलिसांकडून समोर येत आहे.

Delhi, Rajasthan Flight: दिल्ली, राजस्थानकडे जाणारी विमाने रद्द

दिल्लीतील स्फोटाचा परिणाम आता हवाई वाहतूकीवर झालेल आहे. दिल्ली, राजस्थानकडे जाणारी विमाने काही विमाने रद्द केली आहेत तरी काहीची वेळ बदलली आहे.

Massive explosion near Red Fort Delhi :दहा जणांचा मृत्यू,३० पेक्षा अधिक जखमी

या स्फोटात दहा जणांचा मृत्यू झाला असून, ३० पेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत. याशिवाय दोन संशयितांना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Red Fort blast on Arresrt :  एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं

दिल्ली स्फोट प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहितीही समोर येत आहे. याप्रकरणी सुरक्षा यंत्रणा कसून तपास करत आहेत.

Delhi, Mumbai High alert : दिल्ली, मुंबई पाठोपाठ पुण्यात अलर्ट जारी

लाल किल्ला परिसरातील स्फोटानंतर दिल्ली, मुंबई या दोन प्रमुख शहारांपाठोपाठ पुण्यातही अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे पोलिस अलर्टवर असून, पुण्यातील सर्व महत्त्वाच्या स्थळांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाय, पुणे शहरातील ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे.

Amit Shah Contact PM Modi :अमित शहांनी पंतप्रधान मोदींनी दिली माहिती

गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून स्फोटाबाबत माहिती दिली आहे. याशिवाय स्फोटाच्या चौकशीचे एनआयएला आदेशही दिले गेले आहेत.

Delhi Police : दिल्ली पोलिसांनी दिली स्फोटाबाबत माहिती

आज संध्याकाळी ६.५२ मिनिटांनी गाडीत स्फोट झाला. यावेळी एका गाडीत स्फोट झाला. यावेळी गाडीत प्रवासीही होते. त्यानंतर इतर गाड्यांनी आग लागली. घटनेची माहिती मिळताच प्रशासन घटनास्थळी दाखल झालं आहे.स्फोटाचं कारण काय याचा शोध घेतला जातो आहे. आम्ही परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहोत, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी मीडियाला दिली आहे.

Home Minister Amit Shah : अमित शहा यांनी आयबी प्रमुखांकडून घेतली माहिती

दिल्ली स्फोटानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने बैठक बोलावत आयबी प्रमुखांकडून घटनेबाबत सविस्तर माहिती घेतली आहे. सध्या हाती आलेल्या अपडेटनुसार या स्फोटात आठ जणांचा मृत्यू आणि २४ जण जखमी झाले आहेत.

CSMT High Alert: मुंबई सीएसएमटी स्थानकावर सुरक्षा वाढवली

दिल्लीत लाल किल्ला सारख्या पर्यटकांनी गजबलेल्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडल्यानंतर, मुंबईतील सीएसएमटी स्थानकावर पोलिसांनी सुरक्षा वाढवली असून, कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Home Ministery Meeting: गृहमंत्रालयाने बोलावली तातडीची बैठक

दिल्लीत लाल किल्ला परिसरातील स्फोटाच्या घटनेनंतर गृहमंत्रालयाने तातडीने बैठक बोलावली आहे. तर दिल्ली पोलिस सध्या तरी मीडियाला कोणतीही माहिती देत नसल्याचे समोर येत आहे.

NIA Delhi Red Fort Blast : घटनास्थळी फॉरेन्सिक टीम, एनआयए टीम दाखल

स्फोटानंतर तातडीने घटनास्थळी फॉरेन्सिक आणि एनआयए टीम दाखल झाल्या आहेत. याशिवाय, दहा रुग्णवाहिका देखील झालेल्या आहेत.

Delhi Mumbai High Alert: दिल्ली पाठोपाठ मुंबईत हायअलर्ट

लाल किल्ला परिसरात स्फोट झाल्यानंतर राजधानी दिल्ली हादरली आहे. सुरक्षा यंत्रणांची धावपळ सुरू झाली असून, दिल्ली आणि मुंबईतही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

Delhi Red Fort Blast Death :आठ जणांचा मृत्यू

आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार दिल्लीतील या भीषण स्फोटात आठ जणांचा मृत्यू झालेल आहे. याशिवाय, अनेकजण जखमी झाले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com