Delhi Riots 2020 Update : ‘’अचानक नव्हता उफळला दिल्लीत हिंसाचार, सत्ता बदलण्यासाठीचा तो होता कट’’ ;पोलिसांचा दावा!

Police make shocking claim on 2020 Delhi riots : २०२०च्या दिल्ली दंगलींबाबत सर्वोच्च न्यायालयात पोलिसांचा प्रतिज्ञापत्रात खळबळजनक दावा केलाय
Delhi Riots 2020 Update : ‘’अचानक नव्हता उफळला दिल्लीत हिंसाचार, सत्ता बदलण्यासाठीचा तो होता कट’’ ;पोलिसांचा दावा!

esakal

Updated on

Delhi Riots 2020 case update : दिल्ली पोलिसांनी २०२०मध्ये घडलेल्या दिल्लीतील दंगलींबाबत सर्वोच्च न्यायालयात १७७ पानांचे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची तयारी केली आहे. ज्यामध्ये या दंगलींना संघतित आणि सुनियोजित सत्ता बदलासाठीचे ऑपरेशन म्हटले आहे.

पोलिसांचा असा दावा आहे की ही हिंसाचार स्वयंस्फूर्त उद्रेक नव्हता तर भारताच्या सार्वभौमत्वाला कमजोर करण्याच्या गंभीर कटाचा भाग होता. सीएए विरोधी निदर्शनांचा वापर देशभरात हिंसाचार भडकवण्यासाठी शस्त्र म्हणून करण्यात आला होता, त्याच पद्धतीचा अवलंब करून, उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, केरळ आणि कर्नाटक सारख्या राज्यांमध्येही हीच पुनरावृत्ती झाली. तसेच, प्रतिज्ञापत्रात पोलिसांनी म्हटले आहे की प्रत्यक्षदर्शी, कागदोपत्री आणि तांत्रिक पुरावे हे सिद्ध करतात की दंगली जातीय कारणांवरून घडवण्यात आल्या होत्या.

याचबरोबर पोलिसांनी  "सीएए विरोधात सार्वजनिक असंतोषाचा वापर भारताच्या सार्वभौमत्वावर आणि अखंडतेवर हल्ला करण्यासाठी शस्त्र म्हणून करण्यात आला होता. ही हिंसाचार संघटित आणि कॅलिब्रेटेड होता, देशभरातील सरकारला अस्थिर करण्याचा एक समन्वित प्रयत्न होता."  असंही सांगितलं आहे.

Delhi Riots 2020 Update : ‘’अचानक नव्हता उफळला दिल्लीत हिंसाचार, सत्ता बदलण्यासाठीचा तो होता कट’’ ;पोलिसांचा दावा!
Rohit Arya Children kidnapped : लहान मुलांना डांबून ठेवलं अन् सगळीकडे रॉकेल ओतलं! कोण आहे रोहित आर्य अन् काय होत्या मागण्या?

तर उमर खालिद आणि शरजील इमाम यांच्यासह अनेक आरोपींनी दाखल केलेल्या जामीन अर्जांना उत्तर म्हणून हे प्रतिज्ञापत्र दाखल केले जात आहे. पोलिसांनी आरोपींवर न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर केल्याचा आरोपही केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com