DelhiRiots:दिल्ली हिंसाचारात 10 बळी; स्थिती नियंत्रणात असल्याचा पोलिसांचा दावा

टीम ई-सकाळ
Tuesday, 25 February 2020

दिल्ली पोलिसांच्या प्रवक्त्यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केलाय.

नवी दिल्ली : दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत दहा जणांचा बळी गेला असून, 150 हून अधिक जण जखमी झाले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेनं जीटीबी हॉस्पिटलच्या हवाल्याने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. ईशान्य दिल्लीतील अनेक भागांत कलम 144 अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या प्रवक्त्यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केलाय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आणखी वाचा - दिल्लीतील हिंसाचार रोखण्यासाठी ओवैसींनी सूचवला पर्याय

हुतात्मा रतन लाला यांच्यावर अंत्यसंस्कार 
दिल्लीतील हिंसाचारात हुतात्मा झालेले कॉन्स्टेबल रतन लाल यांच्यावर आज शासकीय इतमामांत अंत्यसंक्कार करण्यात आले. दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजाल आणि पोलिस आयुक्त अमुल्य पटनाईक यांनी त्यांना आदरांजली वाहली. काल (सोमवार, 24 फेब्रुवारी) ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारात रतन लाल यांचा मृत्यू झाला होता. आज, दिल्ली हिंसाचारातील मृतांची संख्या 10वर पोहोचली आहे. दरम्यान, जखमींना वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आज, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली. 

आणखी वाचा - आफ्रिदी म्हणतो, मोदी सत्तेत आहेत तोपर्यंत

आणखी वाचा - मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेचा प्रवास महागणार!

काय घडलं दिवसभरात?

  • दिल्ली हिंसाचारातील बळींची संख्या पोहोचली दहावर, यात एका पोलिस कर्मचाऱ्याचाही समावेश 
  • मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे दिल्लीतील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन 
  • मुख्यमंत्री केजरीवाल यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट
  • दिल्लीतील कायदा सूव्यवस्थेवर केजरीवाल-अमित शहा यांच्यात चर्चा 
  • दिल्लीत शांतता राखण्यासाठी लष्कराला पाचारण करा, असदुद्दीन ओवैसी यांची मागणी 
  • हिंसाचाराच्या घटनांमुळे शाळा महाविद्यालयांना सुटी 
माझं दिल्लीतील नागरिकांना विशेषतः ईशान्य दिल्लीतील नागरिकांना आवाहन आहे की, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांनी कायदा हाती घेऊ नये. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. आम्ही ड्रोनचीही मदत घेत आहोत.
- एमएस रंधवा, प्रवक्ते, दिल्ली पोलिस 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi riots updates death toll information marathi