दिल्लीतील हिंसाचार रोखण्यासाठी ओवैसींनी सुचवला पर्याय

टीम ई-सकाळ
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ईशान्य दिल्लीतील हिंसाचारावर चिंता व्यक्त केलीय. 

नवी दिल्ली : दिल्लीत सध्या सीएएवरून हिंसाचार उसळलाय. नागरिकत्व सुधारणा विधेयकाला (सीएए) विरोध करणारे आणि कायद्याचे समर्थन करणारे आमने-सामने आहेत. या पार्श्वभूमीवर ऑल इँडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएमआयएम) पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी वक्तव्य केलयं. ईशान्य दिल्लीतील हिंसाचारावर ओवैसी यांनी चिंता व्यक्त केलीय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

ओवैसी काय म्हणाले?
ईशान्य दिल्लीतील परिस्थिती सध्या हाताबाहेर जात असल्याचं दिसत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर असताना, राजधानीत हिंसाचार उसळला आहे. राजधानी दिल्लीत आम आदमी पक्षाची सत्ता असली तरी, दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था केंद्रीय गृहमंत्रालयाच्या हातात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. पोलिस आपली जबाबदारी पार पाडत असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलंय. दुसरीकडं दिल्लीची सुरक्षा व्यवस्था गृहमंत्री अमित शहा यांच्या हातात असल्यामुळं त्यांच्यावर टीका सुरू झालीय. एमआयएमचे खासदार औवेसी यांनी दिल्लीची सुरक्षा आता लष्कराच्या हातात द्या, असा पर्याय सुचवलाय. ओवैसी म्हणाले, 'ईशान्य दिल्लीची अवस्था गेल्या दोन दिवसांत अधिकच चिंताजनक झाली आहे. जर, या भागात पंतप्रधान कार्यालयाला खरचं शांतता बघायची आहे. तर, त्यांनी दिल्लीची सुरक्षा लष्कराच्या हातात द्यायला हवी. दिल्ली पोलिसांचा निष्काळजीपणा स्पष्ट झालाय. त्यामुळं दिल्लीला लष्कराच्या हाती सोपवणं हा एकच पर्याय दिसत आहे.'

आणखी वाचा - भाजप नेत्याची चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या 

केंद्रीय गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी, हैदराबादमध्ये काय करत आहेत? त्यांनी तातडीने दिल्लीला जायला हवे. दिल्लीती परिस्थिती हाताळायला हवी. जिथं सात जणांचा बळी गेलाय तिथं त्यांनी काम करायला हवं.
- असदुद्दीन ओवैसी, खासदार एमआयएम

आणखी वाचा - दिल्लीतील शाळापाहून मेलानिया ट्रम्प झाल्या इम्प्रेस 

केजरीवाल-अमित शहा चर्चा
सध्या ईशान्य दिल्लीमध्ये दगडफेकीच्या जाळपोळीच्या घटना घडत आहेत. दिल्लीची सुरक्षा लष्कराच्या हाती सोपविण्याविषयी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर केजरीवाल म्हणाले, 'जर गरज वाटली तर, निश्चितच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, सध्या तरी दिल्ली पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या बैठकीत आम्हाला आश्वासन देण्यात आलंय की,  गरजेनुसार पुरेसे पोलिस दल तैनात केले जाईल'
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AIMIM Asaduddin Owaisi reaction on Delhi riots should appoint army for control