Delhi Court : मनी लाँड्रिंग प्रकरणी 'आप'च्या मंत्र्याला मोठा धक्का; न्यायालयानं फेटाळला जामीन अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satyendra Jain

सत्येंद्र जैन यांच्याशिवाय अन्य दोघांचा जामीन अर्जही फेटाळण्यात आला आहे.

Delhi Court : मनी लाँड्रिंग प्रकरणी 'आप'च्या मंत्र्याला मोठा धक्का; न्यायालयानं फेटाळला जामीन अर्ज

दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांना न्यायालयानं मोठा धक्का दिलाय. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टानं (Rouse Avenue Court) जैन यांच्या जामिनाशी संबंधित सर्व अर्ज फेटाळले आहेत.

सत्येंद्र जैन यांच्याशिवाय अन्य दोघांचा जामीन अर्जही फेटाळण्यात आला आहे. 30 मे रोजी अंमलबजावणी संचालनालयानं सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रिंगशी संबंधित एका प्रकरणात अटक केली होती. तेव्हापासून ते तिहार तुरुंगात बंद आहेत.

हेही वाचा: Political News : 2024 मध्ये हरलो तर निवडणूक कधीच लढवणार नाही; माजी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मागील सुनावणीदरम्यान विशेष न्यायाधीश विकास धुळ यांच्या न्यायालयानं सांगितलं होतं की, अद्याप आदेश तयार झालेला नाहीये. मनी लाँड्रिंग प्रकरणात 12 जून 2022 पासून आप नेते आणि दिल्लीचे कॅबिनेट मंत्री सत्येंद्र जैन न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीनं 30 मे रोजी मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्यांना अटक केली होती. जैन यांनी अनेक ऑपरेटर्सना रोख रक्कम पुरवल्याचा आरोप अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) केला आहे. तर, ईडीचे आरोप जैन यांनी फेटाळले आहेत. या प्रकरणी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयानं निर्णय राखून ठेवला होता. आज त्यांनी आपला निकाल जाहीर केलाय.