esakal | Delhi: इंदिराजींच्या पत्रात सावरकरांचा गौरव
sakal

बोलून बातमी शोधा

इंदिराजींच्या पत्रात सावरकरांचा गौरव
दिल्ली : इंदिराजींच्या पत्रात सावरकरांचा गौरव

दिल्ली : इंदिराजींच्या पत्रात सावरकरांचा गौरव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर काँग्रेसकडून सातत्याने टीका केली जात असताना तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वत:च सावरकारांच्या कार्याचा गौरव केल्याची बाब समोर आली आहे. याअनुषंगाने इंदिरा गांधी यांच्या सहीचे पत्र व्हायरल झाले आहे.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी हे पत्र ट्विटरवर अपलोड केले आहे. इंदिरा गांधी यांनी हे पत्र दादरमधील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सचिवांना पाठविले होते. यात सावरकर यांची जन्मशताब्दी साजरी करण्याचा संदर्भ आहे. हे पत्र त्यांनी २० मे १९८० रोजी पंडित बखले यांना पाठविले होते. या पत्राचा वापर आता भाजप काँग्रेसच्या सावरकरविरोधी भूमिकेवर टिकेसाठी करणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

हेही वाचा: आव्हाडांऐवजी दुसऱ्या कुणाला त्वरित जामीन मिळाला असता का? - राम कदम

इंदिरा गांधी यांनी पत्रात म्हटले आहे की, ब्रिटिश सरकारला वीर सावरकरांनी धाडसाने केलेल्या विरोधाला स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचे स्थान आहे. तसेच इंदिरा गांधी यांनी या पत्रात सावरकारांचा उल्लेख असामान्य काम करणारा भारताचा पुत्र असा केला आहे. त्यांची जन्मशताब्दी साजरी करावी, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या असल्याचे या पत्रात दिसून येते. या पत्रावर काँग्रेसकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

loading image
go to top