esakal | राजधानीत दिल्लीत आता लशींचा दुष्काळ
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine

राजधानीत दिल्लीत आता लशींचा दुष्काळ

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील (Delhi) ऑक्सिजनचे (Oxygen) संकट (Crisis) दूर होण्याची चिन्हे असतानाच आता कोरोना लशींच्या (Corona Vaccine) तुटवड्याचा (Shortage) प्रश्न समोर आला. येत्या ३ महिन्यांमध्ये सर्वच वयोगटांतील दीड कोटी दिल्लीकरांना लसीकरण (Vaccination) पूर्ण करण्याचे राज्य सरकारने (State Government) ठरवले आहे. मात्र त्यासाठी दिल्लीला केंद्राकडून दररोज ३ लाख म्हणजेच एकूण ३ कोटी डोस लागतील, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी स्पष्ट केले. (Delhi shortage of vaccines)

गेले किमान २५ दिवस दिल्लीत रुग्णसंख्येचा जो विस्फोट झाला होता, त्याचा उतरता कल आता दिसू लागला आहे. गेल्या २४ तासात नवीन रुग्णसंख्या २० हजारांवरून १८ हजारांच्या आसपास स्थिरावली. मात्र मृत्यूसंख्या अजूनही साडेतीनशे ते ४०० च्या घरातच आहे. सध्याच्या परिस्थितीत वेगवान लसीकरण हाच कोरोनाला रोखण्यासाठीचा उपाय आहे. त्यामुळे दिल्ली सरकारने यासाठी युद्धपातळीवर लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. यापूर्वी दिल्लीला ऑक्‍सिजनचा पुरेसा पुरवठा करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राचे कान उपटल्यावर तो प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण होत नाही, तोच आता दिल्लीत पुरेशा लसमात्रांच्या पुरवठ्याचा प्रश्न उग्र होऊ लागला आहे. दिल्लीत कोरोना लशींची कमतरता असल्याचे चित्र रोज दिसत आहे. ज्यांना लसीकरणाचे तारीख आणि वेळ याबाबतचे मोबाईल संदेश गेले त्यांनाही लसीकरणाच्या प्रतीक्षेत तासनतास रांगा लावून उभे राहावे लागत आहे.

हेही वाचा: "सत्तेसाठी केंद्रीय मंत्री रोज होते बंगालमध्ये, पण राज्यासाठी काहीही केलं नाही"

केजरीवाल म्हणाले, की राज्याकडे आगामी फक्त ५ ते ६ दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा आहे. दिल्लीच्या शेजारच्या राज्यांमधील फरीदाबाद, सोनीपत , गाझियाबाद, नोएडा, ग्रेटर नोएडा या भागातील लोकही दिल्लीत येऊनच लसीकरण करून घेत आहेत. त्यामुळे राज्य सरकारला लसीची जास्त आवश्यकता आगामी काळात भासणार आहे, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

अठरा वर्षांच्या आतील मुलांना ही लसीकरण त्वरित सुरू करावे आणि त्यासाठी केंद्राने लवकरात लवकर दिल्लीला पुरवठा करावा, असे आवाहन त्यांनी केले. दिल्लीतील सरकारी शाळांमध्ये लसीकरण सुरू केले असून, सध्या किमान १०० शाळांमध्ये १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना लसीकरणाचे काम सुरू आहे.

दिल्लीत १८ वर्षांपुढील दीड कोटी लोकांचे लसीकरण होणार आहे. त्यादृष्टीने राज्याला किमान तीन कोटी डोस आवश्यक आहेत. आतापर्यंत ४० लाख लसीचे डोस मिळाले आहेत. सध्या दररोज

दीड लाख लोकांचे लसीकरण दिल्ली सरकार करत आहे. आगामी काळात दिल्लीतील सर्व प्रसारमाध्यमांच्या कार्यालयांमध्ये जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याची योजना राज्य सरकारने आखली आहे.

- अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री