
Supreme Court
Sakal
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीमध्ये दिवाळीच्या काळात हरित फटाके उडविण्यास परवानगी दिली आहे. ‘‘या फटाक्यांची १८ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत विक्री करता येईल तसेच ते उडविण्यावर कसल्याही प्रकारचे बंधन असणार नाही,’’ असे सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्या. के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.