
नवी दिल्ली: दिल्लीतील वसंतकुंज येथील एका प्रसिद्ध आश्रमाचा प्रमुख आणि संचालक स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थसारथी याच्यावर सुमारे १५ विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप असून, तो सध्या फरार आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. आरोपीला पदावरून हटवल्याचे आश्रम प्रशासनाने सांगितले आहे.