Delhi Election:दिल्लीत आपच्या 51 टक्के उमेदवारांवर गुन्हे!

टीम ई-सकाळ
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

दिल्लीत 70 जागांसाठी येत्य 8 फेब्रुवारीला मतदान होत आहे. या 70 जागांसाठी 672 उमेदवार रिंगणात आहे.

नवी दिल्ली Delhi Election 2020 : राजकारणात सुधारणा करण्याचा विडा घेतलेल्या आम आदमी पक्षाचे उमेदवारच डागाळलेले असल्याचं स्पष्ट झालंय. दिल्ली विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या 51 टक्के उमेदवारांवर वेगवेगळ्या कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. निवडणुकीत एकूम 672 उमेवारांपैकी 20 टक्के म्हणजेच 133 उमेदवारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहे. विशेष म्हणजे, यात सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या उमेदवारांचीच संख्या सर्वाधिक आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्लीत 70 जागांसाठी येत्य 8 फेब्रुवारीला मतदान होत आहे. या 70 जागांसाठी 672 उमेदवार रिंगणात आहे. राजकारणात सुधारणा करण्याची घोषणा केलेल्या आम आदमी पक्षाचे 70 पैकी 36 उमेदवार डागाळलेले असून त्यांच्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. असोसिएशन ऑफ डेमॉक्रेटिक रिफॉर्म (एडीआर) या संस्थेने ही आकडेवारी जाहीर केली आहे. यात मात्र भाजप आणि काँग्रेस, आपपेक्षा माग आहेत. भाजपच्या 17 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत तर, काँग्रेसच्या 13 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, या सगळ्या उमेदवारांवर कोणत्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आणखी वाचा - शाहीनबाग गोळीबारानंतर सोनम कपूर म्हणते...
 

पक्षनिहाय गुन्हे दाखल असलेले उमदेवार
राजकीय पक्ष  एकूण उमेदवार गुन्हे दाखल असलेले उमेदवार
आम आदमी पक्ष 70 36
भाजप  67 17
काँग्रेस  66 13

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi vidhan sabha 2020 36 candidate aam aadmi party have criminal cases