दिल्ली हिंसाचाराचे ‘इसिस’कनेक्शन; आत्मघाती हल्ल्याचा कट उधळला, दाम्पत्याला अटक

वृत्तसंस्था
रविवार, 8 मार्च 2020

नवी दिल्ली : मुस्लिम तरुणांना हल्ल्यांसाठी चिथावणी देत देशाच्या राजधानीमध्येच आत्मघातकी हल्ल्याचा कट आखणाऱ्या एका काश्‍मिरी दाम्पत्याला दक्षिण दिल्लीतील पोलिसांनी अटक केली आहे. हे दाम्पत्य अफगाणिस्तानातील खोरासान प्रांतातील इसिस या दहशतवादी संघटनेच्या युनिटच्या संपर्कात होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानिमित्ताने इसिसची पावले दिल्लीच्या दिशेने पडत असल्याचे उघड झाल्याने तपास यंत्रणा सावध झाल्या आहेत. नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिकेविरोधात (एनआरसी) राजधानीतील आंदोलनास चिथावणी देण्यामध्ये या दाम्पत्याचा मोठा वाटा होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, या रॅकेटच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा शोध घेणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘‘दिल्लीतील नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनास याच दाम्पत्याने चिथावणी दिली होती; तसेच मुस्लिम तरुणांना आत्मघाती हल्ले घडवून आणण्यासाठी हेच दाम्पत्य चिथावणी देत होते.’’ जहाँजेब सामी आणि हिना बशीर बेग असे दाम्पत्याचे नाव असून आज सकाळीच या दोघांना जामिया नगरमधून ताब्यात घेण्यात आले. हा परिसरदेखील जामिया विद्यापीठालाच लागून आहे. या दाम्पत्याच्या ताब्यातून काही चिथावणीखोर, भडक साहित्य देखील जप्त करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. जहानजेब सामी हा एका खासगी कंपनीत काम करतो. हेच दाम्पत्य इंडियन मुस्लिम युनाईट नावाने एक संकेतस्थळ देखील चालविते. नागरिकत्व कायद्याविरोधातील जनक्षोभ एकत्रित करण्याचे काम या संकेतस्थळाच्या माध्यमातून केले जाते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आणखी वाचा - या देशातल्या महिला आहेत सगळ्यांत जास्त जाड

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi violence police arrest couple suicide bomber isis