
दिल्लीतील उत्तमनगर भागात एका महिलेने आपल्या पतीला हालहाल करुन मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीला मारण्यासाठी पत्नीने आधी त्याला झोपेच्या गोळ्या दिल्या आणि नंतर वीजेचा करंट देऊन त्याची हत्या केली. या क्रूर हत्येत महिलेचा प्रियकरही सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी महिलेचा मोबाईल तपासला तेव्हा संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.