Delhi Wife Killed Husband : इंदूरमधील सोनम रघुवंशी (Sonam Raghuvanshi) आणि तिच्या प्रियकरानं केलेल्या हत्येच्या घटनेनंतर देशभरात खळबळ उडाली असताना, त्याच धर्तीवर आणखी एक धक्कादायक प्रकरण दिल्लीमध्ये उघडकीस आलंय. दक्षिण दिल्लीतील ५६ वर्षीय रवींद्र कुमार (Ravindra Kumar) यांचा मृतदेह उत्तराखंडमधील कोटद्वारजवळील दरीत सापडला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता, यामागं त्याची पत्नी रीना सिंधू आणि तिचा प्रियकर परितोष असल्याचं निष्पन्न झालं.