Crime News | लिव्ह इन पार्टनरच्या दबावामुळे १४ वेळा गर्भपात; महिलेची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suicide By Woman
लिव्ह इन पार्टनरच्या दबावामुळे १४ वेळा गर्भपात; महिलेची आत्महत्या

लिव्ह इन पार्टनरच्या दबावामुळे १४ वेळा गर्भपात; महिलेची आत्महत्या

लिव्ह पार्टनरने १४ वेळा गर्भपात करण्यासाठी भाग पाडल्याने एका ३३ वर्षांच्या महिलेने आत्महत्या केली आहे. दिल्लीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. लग्न करण्याचं आमिष दाखवत तिच्या पार्टनरने तिच्यासोबत अनेकदा संबंध ठेवले होते. (Suicide News in Marathi)

पोलिसांना या महिलेच्या घरात एक सुसाईड नोटही सापडली आहे. यामधून हे खुलासे झाले आहेत. लग्न करण्याची आश्वासनं देत या व्यक्तीने महिलेशी संबंध ठेवले होते. मात्र नंतर त्याने लग्नाला नकार दिला. त्यामुळे आपल्याकडे मृत्यू पत्करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही, असं या महिलेने आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा: लग्नाचे वचन देणाऱ्या प्रियकरा कडून ब्लॅकमेलींग; तरुणीची आत्महत्या

पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करतो. पाच जुलै रोजी पोलिसांना एका महिलेच्या आत्महत्येची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता या महिलेने गळफास लावून घेतल्याचं आढळून आलं. महिलेला तात्काळ दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोवर तिला मृत घोषित करण्यात आलं होतं.

हेही वाचा: आत्महत्या केलेली अल्पवयीन मुलगी गर्भवती; शवविच्छेदन अहवालातून झाले उघड

पोलिसांनी केलेल्या तपासात लक्षात आलं आहे की ही महिला गेल्या सात ते आठ वर्षांपासून आपल्या पतीपासून लांब राहत होती. तिच्या लिव्ह इन पार्टनरने तिला तब्बल १४ वेळा गर्भपात करण्यास भाग पाडलं. तसंच लग्न करण्यासही नकार दिला. म्हणून या महिलेने आत्महत्या केली.

Web Title: Delhi Woman Suicides After Being Forced To Abort Pregnancy 14 Times By Partner

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..