दिल्लीत घडला इतिहास; पहिल्यांदाच महिला काझीनं लावला निकाह

delhi women qazi marriage rituals nikaah
delhi women qazi marriage rituals nikaah esakal
Updated on

पिढ्यानपिढ्या मुस्लीम समाजात पुरुष काझी निकाह लावतात हे आपण अनेकदा पाहिले आहे. पण या प्रथेला फाटा देत दिल्ली येथे माजी राष्ट्रपती झाकीर हुसेन यांच्या नातवाचा निकाह महिला काझींनी लावाला. सध्या या निकाहचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(delhi women qazi marriage rituals nikaah)

delhi women qazi marriage rituals nikaah
भारतात वेगाने वाढतयं अविवाहितांच प्रमाण, तरुणांचं लग्नाचं सरासरी वय २ वर्षांनी वाढलं

सैयदा सैयदैन हमीद असे निकाह पढविणाऱ्या महिलेचे नाव आहे. दिल्ली येथे माजी राष्ट्रपती झाकीर हुसैन यांचे नातू जिब्रान रेहान रेहमान आणि उर्सिला अली यांचा निकाह शुक्रवारी पार पडला. या निकाहला जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होता. सैयदा सैयदैन हमीद या नियोजन आयोगाच्या माजी सदस्य आहेत.(zakir husain great grand son nikah)

delhi women qazi marriage rituals nikaah
कावड यात्रेदरम्यान कट्टरपंथीयांकडून धोका; गृहमंत्रालयानं गुप्तचर यंत्रणेला केलं 'सतर्क'

सैयदा सैयदैन हमीद यांनी पहिल्यांदा २००७ मध्ये लखनऊ येथे निकाह पढला होता. त्यानंतर १७ ते १८ त्यांनी निकाहमध्ये काझीची भूमिका निभावली आहे.

महिला काझींनी निकाहनाम्यात सर्व विधी पूर्ण केले आहेत आणि जुन्या चालीरींना फाटा दिला आहे. असे सांगत कुराणमध्ये अशी कोणतीही अट नाही की, महिला निकाहनामा करू शकत नाहीत. अशी भावना सैयदा सैयदैन हमीद यांनी व्यक्त केली.

यापूर्वी, महिला काझी हकीमा खातून या भारतातील निकाह पढविणाऱ्या पहिल्या महिला काझी बनल्या आहेत. त्यांनी २०१९ मध्ये मुंबईत शेमोन अहमद आणि माया राचेल यांचा निकाल लावून दिला होता.

काझी हकीमा यांनीदेखील, 'कुराणात महिलांनी निकाहचा खातुबा पढू नये असे कुठेही म्हटलेले नाही. हे काही शब्द आहेत. पुरुष काझी ते वाचू शकतात तर महिला काझी का वाचू शकणार नाहीत? ''अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com