‘झायडस’ची लस मिळणार २६५ रुपयांना

चर्चेनंतर झायडस कॅडिलाने ‘झायकोव्ह डी’या कोरोना लशीच्या एका डोसची किंमत कमी करून २६५ रुपये करण्याची तयारी दर्शविली आहे.
‘झायडस’ची लस
‘झायडस’ची लसSAKAL

नवी दिल्ली : केंद्र सरकारशी केलेल्या चर्चेनंतर झायडस कॅडिलाने ‘झायकोव्ह डी’या कोरोना लशीच्या एका डोसची किंमत कमी करून २६५ रुपये करण्याची तयारी दर्शविली आहे. सुईविरहीत इंजेक्शची किंमत ९३ रुपये असून या इंजेक्शनसह लशीच्या एका डोससाठी ३५८ रुपये मोजावे लागतील. यासंदर्भात कंपनी लवकरच अंतिम निर्णय घेणार आहे.

ही लस सुईमुक्त असून यापूर्वी कंपनीने लशीच्या तीन डोससाठी १,९०० रुपयांचा प्रस्ताव दिला होता.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालय लसीकरणाशी संबधित राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या शिफारशींची प्रतिक्षा करत आहे. हा गट झायडसच्या लशीचा राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत समावेश करण्यावर विचार करत आहे. ही लस १२ ते १८ वयोगटातील मुलामुलींनाही दिली जाऊ शकते. त्यामुळे, अद्याप या वयोगटातील मुलामुलींना लस मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

तीन डोस घ्यावे लागणार

या लशीचे तीन डोस दिले जातील. पहिल्या डोसनंतर दुसरा २८ दिवसांनी तर ५६ दिवसांनंतर तिसरा डोस दिला जाईल. लसीकरणासंदर्भात कंपनीचे केंद्र सरकारशी आतापर्यंत तीनवेळा चर्चा झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com