Delhi Riot : उमर खालिदसह दोन आरोपींची निर्दोष मुक्तता, करकरडूमा न्यायालयाचा निकाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Umar Khalid

Delhi Riot : उमर खालिदसह दोन आरोपींची निर्दोष मुक्तता, कर्करडूमा न्यायालयाचा निकाल

Delhi 2020 Riot : उत्तर पूर्व दिल्लीतील फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या दंगलीशी संबंधित खटल्यात दिल्लीतील कर्करडूमा न्यायालयाने जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी उमर खालिद आणि खालिद सैफी यांची निर्दोष मुक्तता केली आहे. उत्तर पूर्व दिल्लीतील दंगलीशी संबंधित एका खटल्याची सुनावणी शनिवारी कोर्टात पार पडली. त्यावेळी न्यायालयाने हा महत्वपूर्ण निर्णय सुनावला आहे. अडीच वर्षांनंतर हा आमच्यासाठी मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया खालिद सैफीची पत्नी नर्गिस सैफी यांनी दिली आहे.

हेही वाचा : वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

चांदबाग येथील दगडफेकीच्या प्रकरणात दोघांनाही यापूर्वी जामीन मिळाला होता, मात्र २०२० मधील दिल्लीतील दंगलीच्या कटाबद्दल हे दोघेही न्यायालयीन कोठडीत होते. २४ फेब्रुवारी २०२० रोजी चांदबाग पुलियाजवळ मोठा जमावाने एकत्र येत मोठ्या प्रमाणात दगडफेक केली होती. या घटनेत खालिद सैफी आणि उमर खालिद यांची नावेही जोडण्यात आली होती. मात्र, आज अखेर दोघांविरुद्ध कोणताही थेट पुरावा नसल्याने न्यायालयाने त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे.

उमर खालिदवर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली दंगलीचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दंगलीत ५३ जणांचा मृत्यू झाला होता, तर ७०० हून अधिक लोक जखमी झाले होते.

टॅग्स :JnudelhiRiot