

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीचा प्रशांत विहार भाग आज स्फोटाच्या तीव्र आवाजाने हादरला. ३८ दिवसांच्या अंतरात दुसऱ्यांदा झालेल्या या स्फोटाची तपास यंत्रणा सजग झाल्या आहेत. या स्फोटात एक व्यक्ती जखमी झाली. प्रशांत विहार येथील बन्सी स्वीट्सजवळ आज एका पार्कच्या बाऊंड्री वॉलपाशी हा स्फोट झाला.