Delimitation Bill 2026
esakal
केंद्र सरकार डिलिमिटेशन म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास प्रत्येक राज्यातील लोकसभेच्या जागांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. त्यानुसार लोकसभेतील खासदारांची संख्या ८१५ पर्यंत गेल्यास सध्याच्या तुलनेत २७० खासदार वाढतील. मात्र, यामुळे केवळ संसदेत जागा वाढणार नाहीत, तर सरकारी तिजोरीवरही मोठा आर्थिक भार पडणार आहे.