Delimitation Bill 2026
esakal
डिलिमिटेशन विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता हे विधेयक संसदेत मांडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणं आणि संसदेत विधेयक संमत होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कारण, हे विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारला दोन्ही सभागृहांत दोन तृतीयांश बहुमताची गरज आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी एप्रिलमध्ये हे विधेयक मांडण्यात आलं होतं. मात्र, त्यावेळी सरकारला आवश्यक संख्याबळ जमवता आलं नव्हतं. त्यामुळे यावेळी सरकार बहुमताचा आकडा कसा गाठणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.