कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन लसीवरही भारी पडू शकतो डेल्टा व्हेरियंट : AIIMS

कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लस अल्फा व्हेरियंटपासून बचाव करू शकते, असं अभ्यासातून स्पष्ट झालं आहे.
Corona Vaccine
Corona Vaccinefile photo
Updated on
Summary

कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लस अल्फा व्हेरियंटपासून बचाव करू शकते, असं अभ्यासातून स्पष्ट झालं आहे.

नवी दिल्ली : कोविड-१९ चा डेल्टा व्हेरियंट कोविशिल्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिनचे (Covaxin) दोन्ही डोस घेतल्यानंतरही व्यक्तीला कोरोना संक्रमित करू शकतो, अशी माहिती पुढे आली आहे. कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट (Delta Variant) भारतात पहिल्यांदा ऑक्टोबरमध्ये सापडला होता. एम्स दिल्ली आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या स्वतंत्र अभ्यासातून हे उघड झाले आहे, पण अद्यापपर्यंत या अहवालाची समीक्षा करण्यात आली नाही. एम्सच्या अभ्यासानुसार, डेल्टा व्हेरियंट युकेमध्ये सापडलेल्या अल्फा व्हेरियंटपेक्षा ४० ते ५० टक्के अधिक संसर्गजन्य आहे. भारतात कोरोनाच्या घटनांमध्ये वाढ होण्याचे कारण हाच डेल्टा व्हेरियंट आहे. (Delta Variant Can Infect Despite Covishield, Covaxin Doses according to studies by AIIMS)

भारतात डेल्टा (B.1.617.2) व्हेरियंट ब्रेकथ्रू इन्फेक्शन्समुळे झाले. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही प्रकारच्या लसी घेतल्यानंतर आढळून आला आहे. अभ्यासात असे आढळून आले आहे की, डेल्टा प्रकार कोवाशिल्ड आणि कोवॅक्सिनची लस घेतलेल्या लोकांमध्ये संसर्ग करण्यास सक्षम आहे. लसीकरण केलेल्या लोकांमध्ये अल्फा आणि डेल्टा व्हेरियंटमुळे ब्रेकथ्रू इन्फेक्शन झाले. अल्फापेक्षा डेल्टाने अधिक लोकांना संक्रमित केल्याचे एम्स आणि सीएसआयआर आयजीआयबीला आढळून आले आहे.

Corona Vaccine
भारतीय रेल्वे होणार अधिक सुरक्षित, 4G स्पेक्ट्रमला केंद्राची मंजुरी

एम्स-आयजीआयबीने ६३ संक्रमित रुग्णांच्या स्थितीचे विश्लेषण केले. ज्यांना ५ ते ७ दिवसांपासून जास्त ताप होता. ६३ पैकी ५३ जणांना कोवॅक्सिनची, तर उरलेल्या १० जणांना कोविशिल्डची लस देण्यात आली. ३६ जणांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले होते. दोन्ही डोस घेतलेल्या ६० टक्के लोकांमध्ये डेल्टा व्हेरियंट संक्रमण झाल्याचे आढळून आले. कोविशील्ड दिलेल्या लोकांना डेल्टा व्हेरियंटच्या संसर्गाची जास्त लागण झाली होती.

Corona Vaccine
तरुण लेखकांसाठी केंद्राची प्रोत्साहन योजना, जाणून घ्या सविस्तर

अल्फा व्हेरियंटपासून होऊ शकते संरक्षण

कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लस अल्फा व्हेरियंटपासून बचाव करू शकते, असं अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. डेल्टा आणि अल्फा व्हेरियंटपासून दोन्ही लसी संरक्षण करू शकतात, पण संसर्गाची तीव्रता प्रत्येक बाबतीत सारखीच असेल असे नाही, असंही अभ्यासकांनी स्पष्ट केलं आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा डेल्टा व्हेरियंटशी संबंध होता याबाबत कोणतेही पुरावे नाहीत. कोवॅक्सिन डेल्टा आणि बीटा दोन्ही व्हेरियंटपासून संरक्षित करते, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. बीटा व्हेरियंट सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता.

Corona Vaccine
कोरोनावर सर्जिकल स्ट्राईक करा; HCचा केंद्राला सल्ला

गेल्या आठवड्यात एनसीडीसी (NCDC) आणि भारतीय सार्स सीओव्ही 2 जीनोमिक कन्सोर्टियाच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, भारतात कोरोनाची दुसरी लाट येण्यामागे डेल्टा वेरियंट कारणीभूत होता. मे महिन्याच्या सुरूवातीला कोरोनाची दुसर्‍या लाट अत्यंत धोकादायक स्थितीत पोचली होती. दररोज देशात चार लाखाहून अधिक नवे रुग्ण आढळून येत होते.

(Edited by : Ashish N. Kadam)

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com