तरुण लेखकांसाठी केंद्राची प्रोत्साहन योजना, जाणून घ्या सविस्तर

भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय साहित्याचे आधुनिक राजदूत तयार करण्याची कल्पना या योजनेद्वारे राबविण्यात येणार आहे.
PM Modi
PM Modifile photo
Summary

भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय साहित्याचे आधुनिक राजदूत तयार करण्याची कल्पना या योजनेद्वारे राबविण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : भारतीय वारसा, संस्कृती आणि ज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी ३० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लेखकांच्या गटाची स्थापना करण्याच्या उद्देशाने एक विशेष योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेमुळे तरुणांना त्यांच्या लेखन कौशल्याला गती मिळवून देता येईल, तसेच देशाच्या बौद्धिक संवादात तरुणांना हातभार लावता येईल, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (ता.८) दिली. (PM Modi unveils YUVA scheme for young writers and offers stipend of Rs 50000)

पंतप्रधान मोदींनी या नव्या योजनेबद्दलची माहिती ट्विटरवरून दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०नुसार तरुणांना सशक्त करण्यासाठी तसेच भविष्यात युवांना नेतृत्वाची भूमिका घेण्यास योग्य बनवण्यावर भर देण्यात येत आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षपूर्ती निमित्ताने 'युवा : प्राइम मिनिस्टर्स स्कीम फॉर मेंटरिंग यंग ऑथर्स' (युवा लेखकांना मार्गदर्शन करणारी पंतप्रधान योजना) ही राष्ट्रीय योजना महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

PM Modi
कोरोनावर सर्जिकल स्ट्राईक करा; HCचा केंद्राला सल्ला

या योजनेंतर्गत ३० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लेखकांचा गट तयार केला जाईल, जे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ला व्यक्त करण्यास आणि भारताची भूमिका मांडण्यात सक्षम असतील. तसेच भारतीय संस्कृती आणि साहित्याची जागतिक पातळीवर ओळख निर्माण करण्यात मदत करतील, असे नमूद करण्यात आले आहे.

PM Modi
खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ; पाहा संपूर्ण यादी

भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय साहित्याचे आधुनिक राजदूत तयार करण्याची कल्पना या योजनेद्वारे राबविण्यात येणार आहे. पुस्तक प्रकाश क्षेत्रात भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. आणि देशी साहित्याच्या या खजान्याला जागतिक पातळीवर ओळख मिळवून देणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षा मंत्रालयांतर्गत नॅशनल बुक ट्रस्ट ही योजना टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे. अखिल भारतीय स्पर्धेच्या माध्यमातून एकूण ७५ तरुण लेखकांची निवड केली जाणार आहे.

PM Modi
लग्नच नाही, तर घटस्फोट कसला? नुसरतचा खुलासा

ही योजना फक्त भारतीय वारसा, संस्कृती आणि ज्ञानाला प्रोत्साहन देईल, अशा विषयांवर लिहू शकणाऱ्या लेखकांना तयार करण्यास मदत करणार नाही, तर जागतिक पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्या मातृभाषेतून व्यक्त होण्याची संधीही देणार आहे. वैश्विक नागरिक आणि भारताला विश्व गुरु म्हणून पुढे आणण्यासाठी पंतप्रधानांनी ही योजना राबविण्याचे ठरविले आहे.

योजनेबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे :-

- ही स्पर्धा ४ जून ते ३१ जुलै २०२१ पर्यंत घेण्यात येणार आहे.

- स्पर्धकांना ५ हजार शब्दांचे हस्तलिखित सादर करावे लागेल. - निवड केलेल्या लेखकांची नावे १५ ऑगस्ट २०२१ रोजी स्वातंत्र्यदिनी जाहीर करण्यात येतील.

- निवड झालेल्या लेखकांना नामनिर्देशित मार्गदर्शकांनी केलेल्या सूचनेनुसार लेख लिहावे लागतील.

- १५ डिसेंबर २०२१ पर्यंत विजेत्यांच्या लेख प्रकाशनासाठी सज्ज होतील.

- त्यानंतर पुस्तकांचे प्रकाशन राष्ट्रीय युवा दिनी म्हणजे १२ जानेवारी २०२२ रोजी करण्यात येईल.

- युवा लेखकांना साहित्यिक महोत्सव, पुस्तक जत्रा, व्हर्चुअल बुक फेअर, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी विविध आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये सहभागाची आणि त्यांची कौशल्ये वाढवण्याची संधी मिळेल.

- या योजनेअंतर्गत, युवा लेखकांना दरमहा ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती ६ महिन्यांच्या कालावधीसाठी (५०००० x ६ = ३ लाख रुपये) दिली जाईल.

- युवा लेखकांनी लिहलेली पुस्तके एनबीटी, भारत द्वारा प्रकाशित केली जातील.

- तसेच लेखकांना १० टक्के रॉयल्टी देखील मिळणार आहे.

- विविध राज्यांमधील साहित्यिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण सुनिश्चित करण्यासाठी आणि 'एक भारत, श्रेष्ठ भारत' घडविण्यासाठी प्रकाशित पुस्तकांचे अन्य भारतीय भाषांमध्ये अनुवाद केले जातील.

(Edited by : Ashish N. Kadam)

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com