MNS Party : मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी; भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी याचिका केली दाखल

उत्तर भारतीयांना लक्ष्य करुन त्यांच्याविरुद्ध द्वेषपूर्ण विधाने आणि धमक्या दिल्याप्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या अन्य सदस्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी.
MNS Party
MNS Partysakal
Updated on

नवी दिल्ली - महाराष्ट्रात मराठी भाषेत न बोलणाऱ्या उत्तर भारतीयांना लक्ष्य करुन त्यांच्याविरुद्ध द्वेषपूर्ण विधाने आणि धमक्या दिल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या अन्य सदस्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोगाला मनसेची मान्यता रद्द करण्याचे तसेच राज ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी करणारी याचिका महाराष्ट्रातील उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी दाखल केली आहे.

उत्तर भारतीयांच्या हक्कांचे समर्थन केल्याबद्दल आपल्यावर हल्ला करून शारीरिक इजा पोहोचविण्याच्या गंभीर धमक्या आणि शोषणाला सामोरे जावे लागत असल्याचे शुक्ला यांनी याचिकेत म्हटले आहे.

सार्वजनिक ठिकाणी मराठी न बोलणाऱ्या उत्तर भारतीयांविरुद्ध राज ठाकरे यांनी ३० मार्च रोजी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात बोलताना कथितपणे हिंसेला प्रोत्साहन देणारी विधाने केल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com