Delhi Demolition | 'जहाँगीरपुरी'नंतर 'शाहीनबाग'वरही बुल्डोजर; अतिक्रमणांविरोधात कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shaheen Bagh
'जहाँगीरपुरी'नंतर 'शाहीनबाग'वरही बुल्डोजर; अतिक्रमणांविरोधात कारवाई

'जहाँगीरपुरी'नंतर 'शाहीनबाग'वरही बुल्डोजर; अतिक्रमणांविरोधात कारवाई

जहाँगीरपुरीमधल्या अतिक्रमणविरोधी कारवाईनंतर आता दिल्ली प्रशासनाने आपला मोर्चा शाहीनबाग परिसराकडे वळवला आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) विरोधात चाललेल्या निदर्शनांमुळे हा भाग चर्चेत आला होता. दक्षिण दिल्ली महानगरपालिकेने आपली अतिक्रमण मोहीम या भागात राबवण्यास सुरुवात केली आहे.

फक्त रहिवासी आणि पोलीसच नव्हे तर काँग्रेसचे कार्यकर्तेही घटनास्थळी उपस्थित आहेत. ते या अतिक्रमणविरोधी मोहिमेविरुद्ध निदर्शने करत आहेत. या सार्वजनिक जागेवर कोणतंही बेकायदेशीर अतिक्रमण उभारण्यात आलेलं नाही, असा दावा शाहीनबागच्या रहिवाश्यांनी केला आहे. हा CPWD रस्ता आहे, त्यामुळे दिल्ली महानगरपालिकेचा याच्याशी काहीही संबंध नाही. लोकांनी आपल्या घरांसमोर रस्त्यांवर जागा सोडल्या आहेत, अशी माहितीही स्थानिकांनी दिली.

हेही वाचा: Jahangirpuri Demolition Photos : दंगलग्रस्त भागात दिल्ली महापालिकेचा बुलडोझर

दिल्ली भाजपाचे प्रमुख आदेश गुप्ता यांनी महापौरांना पत्र लिहित रोहिंग्या, बांग्लादेशी आणि समाजविघातक घटकांनी केलेली अतिक्रमणे हटवा, अशी मागणी केली होती. त्यानंतर दक्षिण दिल्ली महानगरपालिकेने ही अतिक्रमण मोहीम उघडली आहे. यापूर्वी उत्तर दिल्ली महानगरपालिकेने दोन गटांत हिंसाचार उफाळल्यानंतर जहाँगीरपुरीमधली (Jahangirpuri Violence) काही दुकानं आणि घरं अतिक्रमण विरोधी मोहिमेंतर्गत जमीनदोस्त केली होती.

Web Title: Demolition Drive Bulldozers Reach Delhi Shaheen Bagh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :delhi
go to top