esakal | राज्यसभेत सदस्यांची दाटीवाटी; वेंकय्या नायडू यांची नाराजी
sakal

बोलून बातमी शोधा

venkaiah naidu

राज्यसभेत सदस्यांची दाटीवाटी; वेंकय्या नायडू यांची नाराजी

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - कोरोना (Corona) नियमांमुळे सदस्यांची विशेष बैठक व्यवस्था केली असली तरी राज्यसभेत (Rajyasabha) बहुतेक सदस्य मुख्य सभागृहातच दाटीवाटीने बसल्याचे पाहून सभापती वेंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांनी आज तीव्र नापसंती (Destiny) व्यक्त केली. एकमेकांत सुरक्षित अंतर ठेवण्याचे पथ्य आपण आधी पाळले पाहिजे असे त्यांनी बजावले. (Density of Members in the Rajya Sabha Venkaiah Naidu)

दुसरी लाट व संभाव्य तिसरी लाट पाहता मागील दोन अधिवेशनांप्रमाणेच या अधिवेशनातही खासदारांची बैठक व्यवस्था प्रेक्षक गॅलऱ्यांमध्येही केली गेली आहे. मात्र विरोधी पक्षसदस्यही मुख्य सभागृहात येऊन बसल्याने नियमाचे तीन तेरा वाजले. नायडू यांनी हे पाहून, विशेष व्यवस्था कशासाठी केली, असा सवाल विचारला. गॅलऱ्या तर रिकाम्याच दिसत आहेत, असे त्यांनी सांगितले व सदस्यांना बसण्याची व्यवस्था कोठे आहे हे पुन्हा सांगा, अशीही सूचना अधिकाऱ्यांना केली.

हेही वाचा: रुग्णालये पैसे छापण्याचे उद्योग झालेत - सर्वोच्च न्यायालय

संसदीय समित्या महत्त्वाच्याच

विविध विधेयके संसदीय स्थायी समित्यांकडे छाननीसाठी पाठविण्याऐवजी थेट सभागृहात सादर करून त्याच वेळी मंजूर करून घेण्यावर मोदी सरकारचा भर असल्याची विरोधकांची सतत तक्रार आहे. हे लोकशाही विरोधी असल्याचा आरोप केला जातो. नायडू यांनी संसदीय समित्यांचे कामकाज महत्त्वाचेच असल्याचे पुन्हा सांगितले. उपस्थितीच्या दृष्टीने शिक्षण (६०.२१ टक्के), सांस्कृतिक (५४.८३), कायदा (५१.७८) या समित्यांच्या सदस्यांनी उल्लेखनीय काम केले असेही ते म्हणाले.

loading image