मोदींनी अन् गृहमंत्र्यांनी साधा फोनसुद्धा केला नाही...; सोरेन यांची नाराजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हेमंत सोरेन

मोदींनी अन् गृहमंत्र्यांनी साधा फोनसुद्धा केला नाही...; सोरेन यांची नाराजी

रांची : झारखंडमधील देवघरमधील त्रिकूटजवळ झालेल्या रोपवे दुर्घटनेत तीन प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तब्बल 46 तासांच्या अथक प्रयत्नानंतर रोपवेच्या ट्रॉलीमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे. दरम्यान या घटनेनंतर पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी साधा फोनसुद्धा केला नाही. असं म्हणत झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान झारखंडमधील देवघर येथील त्रिकूट टेकडीवर रोपवेच्या अनेक ट्रॉली एकमेकांवर आदळल्या, या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर रोप-वेच्या केबिनमध्ये अनेक प्रवासी अडकले होते. त्यांना वाचवण्यासाठी बचाव पथकाकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरु करण्यात आले होते. अखेर 46 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अडकलेल्या सर्व प्रवाशांना वाचवण्यात बचाव पथकाला यश आले. दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना देवघर रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे.

हेही वाचा: नडला की तोडला ! माकडाच्या नादी लागला अन्...

या घटनेनंतर पंतप्रधान मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा यांचा एकदाही फोन आला नाही किंवा विचारपूस केली गेली नाही असं म्हणत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी माध्यमांना बोलताना सांगितलं की, त्यांच्यासोबत अधिकृतरित्या कोणतंही बोलणं झालं नाही पण त्यांच्यापर्यंत हा मेसेज नक्कीच पोहोचेल.

दरम्यान या दुर्घटनेत ५० पेक्षा अधिक लोकं अडकून पडले होते. त्यांच्या बचावकार्यात भारतीय लष्कर, हवाई दल, एनडीआरएफ, इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने सहभाग घेऊन लोकांना वाचवण्यात मदत केली. दरम्यान बुधवारी रात्री पंतप्रधानांनी बचावकार्यात सहभागी असलेल्या काही लोकांना फोन करुन त्यांची विचारपूस केली होती. पण मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना फोन केला नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Deoghar Ropeway Accident Cm Hemant Soren Dissatisfied On Pm

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jharkhand
go to top