
नवी दिल्ली : अठराव्या लोकसभेच्या तिसऱ्या (हिवाळी) अधिवेशनाचा निम्म्याहून अधिक काळ संपला तरी अद्याप लोकसभा उपाध्यक्षांची निवडणूक झालेली नाही. संसदीय परंपरेप्रमाणे उपाध्यक्षपद विरोधी पक्षांना मिळणे अपेक्षित असताना विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीनेही यासाठीचा प्रयत्न सोडून दिल्यात जमा आहे.