Desh : 'ब्राह्मोस’ या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राच्या आकारात आता बदल होणार

लहान आणि कमी वजनाच्या ब्राह्मोसची निर्मितीवर भर
अतुल राणे
अतुल राणेsakal

बंगळूर : 'ब्राह्मोस’ या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राच्या आकारात आता बदल होणार आहे. ब्राह्मोस एअरोस्पेस लिमिटेडतर्फे हलक्या व लहान आकाराच्या क्षेपणास्त्राला तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे भारतीय हवाई दलाच्या सुखोई या लढाऊ विमानात आता एकच वेळी दोन क्षेपणास्त्रे सहज लावणे शक्य होणार आहे.

याबाबत ब्राह्मोस एअरोस्पेस लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक अतुल राणे यांनी सांगितले, "सध्या ब्राह्मोस हे अडीच टन इतक्या वजनाचे असून हवाईदलात सुखोई या लढाऊ विमानासाठी याचा वापर होत आहे.

अतुल राणे
Desh : मतभेद असू शकतात पण मनभेद नाहीत ; मौलाना महमूद मदनी

मात्र याचा आकार आणि वजन पाहता केवळ एक क्षेपणास्त्र या विमानावर बसविण्यात येत आहे. त्यामुळे लहान व हलक्या वजनाच्या ब्राह्मोस क्षेपणास्त्रासाठी काम सुरू आहे. याच्या प्रत्यक्ष निर्मितीसाठी निधी आवश्यक असून २०२६ पासून याची सुरवात होण्याची शक्यता आहे.

तसेच मध्य २०२६ दरम्यान याच्या उत्पादन प्रक्रियेस सुरवात होईल. त्यामुळे २०२५ अखेरपर्यंत पर्यंत याच्या डमीद्वारे चाचण्या केल्या जातील. नव्या स्वरूपातील क्षेपणास्त्राची कार्य प्रणाली आणि क्षमतेत मात्र कोणतेही बदल केले जाणार नाही."

या क्षेपणास्त्राची क्षमता वेळीवेळी सिद्ध झाली असून इतर देशांकडून ही याची मागणी होत आहे. त्यात दक्षिण आशियातील सहा आणि मध्य पूर्वच्या चार देशांचा समावेश आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये फिलिपीन्स या देशाने ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या खरेदीसाठी ३७४.९६ मिलियन डॉलरचा करार केला होता. त्यानुसार या वर्षाच्या अखेरपर्यंत या देशाला क्षेपणास्त्रे सुपूर्द केली जातील. असेही ते म्हणाले.

लखनऊ येथे 'ब्राह्मोस' उत्पादनाचे लवकरच नवे प्रकल्प :

ब्राह्मोसच्या निर्मितीसाठी आता लखनऊ येथे नवीन प्रकल्प उभारण्यात येत आहे. या नव्या आकाराच्या क्षेपणास्त्राची निर्मितीस आवश्यक त्या प्रक्रिया पार पडल्यावर त्वरित याचे उत्पादन करता यावे म्हणून आधी या उत्पादन प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. असेही राणे यांनी नमूद केले.

देशातील सुमारे २०० उद्योगांचा सहभाग:

या क्षेणास्त्राच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या सुटे भाग पूर्वी मोठ्या प्रमाणात निर्यात केली जात होती. परंतु मेक इन इंडियाच्या माध्यमातून आता निर्यातीचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र गेल्या काही वर्षात देशातील सुमारे २०० उद्योगांच्या सहभागातून हे सुटे भाग उपलब्ध होत आहेत.

सद्य स्थिती :

  • - सध्या याच्या प्राथमिक डिझायन पूर्ण झाली आहे

  • - दरम्यान याला प्रत्यक्षरीत्या साकारण्यासाठी निधीची आवश्यकता

  • - निधी उपलब्ध होताच प्रत्यक्ष क्षेपणास्त्राच्या कामाला सुरवात

  • - डमीद्वारे केली जाणार चाचणी

या छोट्या आकाराच्या क्षेपणास्त्राबाबत :

  • - हे १.३ टन इतक्या वजनाचे असेल

  • - सध्याच्या क्षेपणास्त्राच्या तुलनेत हलक्या वजनाचे

  • - दोन क्षेपणास्त्रांना विमानात बसविणे शक्य

  • - क्षमतेत कोणत्याही प्रकारचे बदल होणार नाही

  • - याच्या निर्मितीसाठी कॉम्पोझिट मटेरिअलचा (फायबर) वापर केला जाईल

  • - क्षेपणास्त्रातील इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर गोष्टी ही लहान असतील.

"जागतिक स्तरावर भारत आता संरक्षण सामग्रीचा पुरवठादार म्हणून ओळखला जात आहे. त्यात संरक्षण सामग्रीसाठी पारंपारिक पुरवठादारांकडून दूर जाण्याची मानसिकता आता कित्येक देशांमध्ये निर्माण होत आहे. ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र सर्वात शक्तिशाली असल्याने विविध देश याची मागणी करत आहेत. असे असले तरी भारत आणि रशिया या दोन देशांच्या एकत्रित मंजुरी शिवाय इतर देशांना हे क्षेपणास्त्र पुरवण्यात येणार नाही."

- अतुल राणे, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय - ब्राह्मोस एअरोस्पेस लिमिटेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com