Hospital
Hospitalesakal

Desh : हरियानातील सरकारी रुग्णालयात नवा ड्रेस कोड लागू

जिन्स, टिशर्ट, प्लाझो घालण्यास मनाई; केशरचनेसाठीही

चंडीगड : हरियानातील सरकारी रुग्णालयात कर्मचाऱ्यांना आता फॅशनेबल कपडे घालता येणार नाही. हरियाना सरकारने डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी नवीन ड्रेस कोड लागू केला आहे. आरेाग्य विभागाच्या आदेशानुसार जिन्स, प्लाझो, बॅकलेस टॉप, स्कर्ट यासारखे कपडे घालण्यास तसेच मेकअप करण्यास मनाई करण्यात आली. तसेच केशरचनेसाठी देखील नियम लागू केले आहेत. पुरुष कर्मचाऱ्यांना विचित्र हेअरस्टाईल करता येणार नाही. त्यांना डोक्यावर लांब केस ठेवता येणार नाही.

हरियानातील रुग्णालयात लागू केलेल्या ड्रेस कोडचे पालन न केल्यास संबंधित कर्मचाऱ्याची हजेरी ग्राह्य धरली जाणार नाही. याप्रमाणे कोणत्याही रंगाची जिन्स, डेनिम स्कर्ट, डेनिम ड्रेस, स्वेट शर्ट, शॉर्ट्स, स्लॅक्स ड्रेस, स्कर्ट, प्लाझो, स्ट्रेच टी शर्ट आणि पँट,फिटिंग पँट, केप्री, हिप हिगर, स्वेटपँट, स्ट्रैपलेस किंवा बॅकलेस टॉप, क्रॉप टॉप, डीप नेक टॉप, टँक टॉप ऑफ शोल्डर ब्लाऊज, स्नीकर आणि स्लिपर घालण्यास मनाई करण्यात आली आहे.

रुग्णालयाचे सुरक्षा रक्षक, वाहन कर्मचारी, सफाई कामगार, स्वयंपाक घरातील कर्मचाऱ्यांनी गणवेशात येणे बंधनकारक आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी नेम प्लेट लावणे आवश्‍यक आहे. त्यावर नाव आणि पदाचा उल्लेख असावा. नर्सिंग श्रेणीतील कर्मचारी वगळता अन्य कर्मचाऱ्यांना पांढरा शर्ट आणि काळी पँटचा पेहराव करता येईल. कपडे अधिक फिट नसावेत आणि केशरचना सामान्य असावी असे नमूद करण्यात आले. ड्रेस कोडचा रंग निश्‍चित करण्याचे अधिकार जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्यात आले आहेत.

सर्व कर्मचाऱ्यांना लागू

हरियाना सरकारचा आदेश सर्व कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे. रुग्णालयात कर्मचाऱ्यांत नियमितबरोबरच कंत्राटी लोकांना देखील गृहित धरले जाणार आहे. क्लिनिकल, पॅरामेडिकलबरोबरच सफाई, सुरक्षा, वाहतूक, टेक्निकलपासून रुग्णालयातील किचनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गणवेशाचे बंधन आहे. प्रशासकीय कामकाज करणारे अधिकारी आणि कर्मचारी जिन्स, टीशर्ट घालू शकणार नाहीत. त्यांना फॉर्मल कपडे घालावे लागणार आहेत.

रुग्ण की कर्मचारी ओळखू येत नाही

ड्रेसकोडबाबत बोलताना आरोग्य मंत्री अनिल विज म्हणाले, की खासगी रुग्णालयातील एकही कर्मचारी गणवेशाशिवाय दिसत नाही. मात्र सरकारी रुग्णालयात रुग्ण कोण आणि कर्मचारी कोण हे कळतच नाही. त्यामुळे ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. यासाठी अधिकृत डिझायनरकडून गणवेशाची रचना करण्यात आली आहे.

ड्रेस कोडची कारणे

बहुतांश रुग्णालयातील महिला कर्मचाऱी ड्रेसऐवजी प्लाझो, पायजामा टॉप, शॉट कुर्ती आणि फिट कपड्यांचा पेहराव करत असल्याचे निदर्शनास आले. तसेच पुरुष कर्मचारी जिन्स, टी-शर्ट्स, स्पोर्ट्स शूज, स्नीकर्स घालून येत होते. अशा प्रकारच्या तक्रारी सरकारकडे आल्या होत्या. त्यानंतर ड्रेसकोडबाबत निर्णय घेण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com