Desh : पुलवामा हल्ला, बालाकोटचा भाजपकडून राजकीय वापर

कम्युनिस्ट नेते माणिक सरकार यांचा आरोप
माणिक
माणिक e sakal

आगरताळा : भाजपने २०१९ मधील निवडणूक जिंकण्यासाठी पुलवामातील दहशतवादी हल्ला तसेच बालाकोटवरील सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय वापर केला, असा आरोप त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री तसेच भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआयएम) ज्येष्ठ नेते माणिक सरकार यांनी केला.

पुलवामातील हल्ला हा सुरक्षा तसेच गुप्तचर यंत्रणांच्या घोर अपयशाचा परिणाम असल्याचा आरोप जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी नुकताच केला होता. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या एका कार्यक्रमात सरकार म्हणाले की, पुलवामा हल्ल्याच्यावेळी जे राज्यपाल होते ते मलिक आता बोलत आहेत. हा हल्ला घडला तेव्हाच आमच्या पक्षाने शंका व्यक्त केली होती. बेरोजगारीसारख्या ज्वलंत समस्यांपासून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी हा योजनाबद्ध कट आखण्यात आल्याचे आमचे म्हणणे होते.

मलिक यांच्या मुलाखतीबाबत आश्चर्य व्यक्त करून सरकार म्हणाले की, पंतप्रधान, केंद्रीय गृह मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनी आता मौन बाळगले आहे. माजी लष्करप्रमुख शंकर रॉयचौधरी यांनीही यावरून चिंता व्यक्त केली आहे.

देशात इतके विरोधी भावनेने वागणारे सरकार प्रथमच सत्तेवर व्यक्त आल्याचे मत व्यक्त करून सरकार म्हणाले की, जनता एकत्र आली तर भाजपला हरविता येऊ शकते. त्रिपुरात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ६० टक्के मतदारांनी भाजपला पाठिंबा दिला नव्हता. उघड टीका करूनही तिप्रा मोथासारख्या पक्षांनी भाजपला सत्तेवर येण्यास मदत केली.

‘सीबीआयबाबत वाटलेच होते‘

सरकार म्हणाले की, सत्यपाल मलिक यांनी मुलाखत दिल्यानंतर त्यांना केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) समन्स येईल असे मला वाटलेच होते. कथित विमा गैरव्यवहारावरून त्यांना हजर राहण्याचा आदेश देण्यात आल्यामुळे माझा अंदाज अचूक ठरला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com