Crime News: देशी बनावटीच्या बॉम्बने घेतला निष्पाप मुलाचा जीव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Crime News: देशी बनावटीच्या बॉम्बने घेतला निष्पाप मुलाचा जीव

उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील जैथरा पोलीस स्टेशन हद्दीतील सरा गावात एका घराच्या छतावर देशी बनावटीच्या बॉम्बचा बॉम्बस्फोट झाला. तिथे खेळणाऱ्या एका मुलाचा एक हात निकळला. तर दोन्ही डोळ्यांना गंभीर दुखापत झाली. जखमींना उपचारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र जैथरा येथे घेवून जाण्यात आलं.

प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना आग्रा येथे हलवण्यात आलं. मात्र जात असतानाच वाटेतच त्या मुलाचा मृत्यू झाला. रविवारी सरा गावात ऋषीपाल यांच्या घराच्या छतावर देशी बनावटीचे बॉम्ब सुकत होते. घराचा दरवाजा उघडाच होता. शेजारी राहणाऱ्या थान सिंह यांचा 5 वर्षांचा मुलगा सनी आणि राघवेंद्र यांचा 6 वर्षाचा मुलगा खेळत खेळत गच्चीवर पोहोचले.

हेही वाचा: Bachchu Kadu: ...तर राणांच्या घरी भांडी घासेन; बच्चू कडू थेट पोलिसांत

अचानक त्या बॉम्बचा स्फोट झाला आणि ते दोघे ही हवेत उडून पडली. या बॉम्बच्या स्फोटात सनीचा एक हात उडून निकळला आणि दुसऱ्या हातालाही गंभीर जखमी झाली. त्यामध्ये त्याचे डोळे खराब झाले. लोकांनी सनीला रुग्णालयात नेले. तेथून एटा मेडिकल कॉलेज आणि नंतर आग्रा येथे रेफर करण्यात आले. या अपघातात दुसरा मुलगा ही रक्तबंबाळ झाला. त्याच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Diwali FestivalUP