"..माजी उपमुख्यमंत्री असूनही दलित असल्याने मला मंदिरात प्रवेश नाकारला" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

despite phd being ex dycm i was denied entry into temple for being dalit parameshwara

'..माजी उपमुख्यमंत्री असूनही दलित असल्याने मला मंदिरात प्रवेश नाकारला'

तुमकुरू (कर्नाटक) : देशात सगळीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जात असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री जी परमेश्वरा यांनी गुरुवारी दावा केला की, पीएचडीची पात्रता असून उच्च पदावर असतानाही त्यांना दलित असल्यामुळे मंदिरात प्रवेश दिला गेला नाही. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष परमेश्वर यांनी आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

ते म्हणाले, 'मी पीएचडी केली आहे, डॉक्टरेटची पदवी घेतली आहे आणि परदेशात प्रवास केला आहे, पण मला मंदिरात प्रवेश दिला गेला नाही. मी राज्यात आमदार, मंत्री, नंबर दोन (उपमुख्यमंत्री) झालो, पण मला मंदिरात प्रवेश दिला गेला नाही. त्यांनी मला (बाहेर) थांबवले आणि मंगला-आरती तिथे आणली.

हेही वाचा: "महिला मुख्यमंत्री असतानाही…"; ममता बॅनर्जींना खासदाराचा घरचा आहेर

काँग्रेस नेते म्हणाले की, 'माझ्याकडे मंगला-आरती आणली होती, पण मला देवाच्या जवळ जाऊन मंगला-आरती घेण्याची परवानगी नव्हती. मी मंदिरात जाऊ नये म्हणून त्यांनी माझ्याकडे आरती आणली. आजही अशी व्यवस्था या समाजात आहे. मी काय म्हणू शकतो.'

एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-जेडीएस युती सरकारमध्ये परमेश्वरा राज्याचे उपमुख्यमंत्री होते. ते कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे सर्वाधिक काळ अध्यक्ष राहिले आहेत.

हेही वाचा: यंदाचा मान्सून कसा असेल? हवामान विभागने जाहीर केला अंदाज

Web Title: Despite Phd Being Ex Dycm I Was Denied Entry Into Temple For Being Dalit G Parameshwara

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Karnataka
go to top