

Dev Deepawali celebration in Kashi
Sakal
when and how did dev deepawali start in Kashi: भगवान शंकराची नगरी असलेल्या काशीमध्ये सर्वत्र 'देव दीपावली'ची रोषणाई दिसू लागली आहे. उद्या, म्हणजेच ५ नोव्हेंबरला, संध्याकाळ होताच संपूर्ण काशी अलौकिक प्रकाशात न्हाऊन निघेल. अर्धचंद्राकृती गंगेचे घाट असोत, किंवा तलाव आणि कुंड... दिव्यांच्या माळा सर्वत्र एक वेगळेच आकर्षण निर्माण करतील.