Varanasi Tour Package : देव दीपावलीसाठी वाराणसीला जाण्याचा खास योग; यूपी पर्यटन विभागाचे टूर पॅकेज १५,९९९ रुपयांपासून

Dev Deepawali Varanasi Tour Package : वाराणसीतील देव दीपावलीचा भव्य सोहळा अनुभवण्यासाठी यूपी पर्यटन विभागाने चार दिवसांचे विशेष टूर पॅकेज जाहीर केले आहे. या सहलीची सुरुवातीची किंमत १५,९९९ रुपये आहे.
Dev Deepawali Varanasi Tour Package

Dev Deepawali Varanasi Tour Package

sakal

Updated on: 

उत्तर प्रदेश : वाराणसीतील प्रसिद्ध देव दीपावलीचा उत्सव जवळून अनुभवता यावा, यासाठी उत्तर प्रदेश राज्य पर्यटन विकास महामंडळाने (UPSTDC) पर्यटकांसाठी विशेष टूर पॅकेज जाहीर केले आहे. ‘देव दीपावली-दिव्य काशी अनुभव’ असे या पॅकेजचे नाव असून, त्याचा कालावधी चार दिवस आणि तीन रात्री असा आहे. या सहलीची सुरुवातीची किंमत १५ हजार ९९९ रुपये प्रति व्यक्ती आहे.

या पॅकेजमध्ये काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन, गंगा आरती, सारनाथची भेट, काशीतील ऐतिहासिक ठिकाणांची सफर आणि देव दीपावलीच्या दिवशी घाटांवरील रोषणाई पाहण्यासाठी विशेष बोट राईडचा समावेश आहे. पर्यटकांना त्यांच्या आवडीनुसार आणि आर्थिक क्षमतेनुसार तीन श्रेणींमधून पॅकेज निवडता येणार आहे.

Loading content, please wait...