esakal | खुशखबर! कोरोनावर दोन औषधे विकसित
sakal

बोलून बातमी शोधा

Medicine

खुशखबर! कोरोनावर दोन औषधे विकसित

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - कोरोनाशी (Corona) झुंजणाऱ्या जगासाठी दिलासादायक आरोग्यवार्ता आहे. वैज्ञानिकांनी कोरोनावर दोन औषधे (Medicine) विकसित (Develop) केली आहेत. यातील पहिले औषध कोरोनापासून संरक्षण (Security) करते. त्याचप्रमाणे, दुसरे औषध कोरोना झालेल्यांना दिल्यास गंभीर संसर्गापासून त्यांचे रक्षण होऊ शकते, असा वैज्ञानिकांचा दावा आहे. (Developed Two Drugs on the Corona)

पेप्टाईडवर आधारित असलेली ही औषधे ऑस्ट्रेलियातील क्युआयएमआर बर्गोफर वैद्यकीय संशोधन संस्थेतील संशोधकांनी विकसित केली आहेत. फ्रान्समधील ‘आयडीएमआयटी’ या पूर्ववैद्यकीय आणि वैद्यकीय संशोधन सुविधा केंद्रात त्यांची चाचणी घेण्यात आली. या औषधांचे थोडेसे दुष्परिणाम असले तरी ती विषारी नसल्याचे स्पष्टीकरणही संशोधकांनी दिले. संशोधनाचे निष्कर्ष ‘नेचर सेल डिस्कव्हरी’ मध्ये प्रकाशित झाले आहेत.

हेही वाचा: ESakal Survey : मोदी सरकारबद्दल करा तुमची 'मन की बात'

ही औषधे सामान्य तापमानाला ठेवता येऊ शकतात. त्यामुळे, त्यांचे व्यवस्थित वितरण होण्याचा विश्वासही संशोधकांना आहे. कोरोना विषाणूची शरीरात प्रवेश करण्याचा पूर्वी माहित नसलेले पद्धत लक्षात आल्यानंतर ही औषधे विकसित करता आली. यातील पहिले औषध मानवी पेशींवरील एसीई२ प्रथिनांचे टोक बंद करून कोरोनापासून रक्षण करते. कोरोना विषाणू या प्रथिनांच्या टोकाच्या मदतीने पेशींवर आक्रमण करतो. विषाणूने यानंतरही पेशींमध्ये आपला मार्ग शोधला तरी दुसरे औषध विषाणूला पेशींवर ताबा मिळवून स्वत:च्या प्रतिकृती तयार करण्यापासून रोखते.

औषधे कशी काम करतात?

ही औषधे कोरोना विषाणूला लक्ष्य करत नाहीत. त्याऐवजी ती पेशी विषाणूला कसा प्रतिसाद देतात, त्यावर लक्ष्य केंद्रित करतात. यातील पहिले औषध कोरोना होऊ नये म्हणून घ्यायचे आहे. ते कोरोना प्रतिबंधक लशीची क्षमता वाढविते. त्याचप्रमाणे, दुसरे औषध कोरोना झाल्यानंतर विषाणुचा पेशींमधील संसर्ग वाढण्यापासून रोखते.

हेही वाचा: "मोदी सरकारने उत्तर कोरियालाही टाकलं मागे"

  • वैद्यकीय चाचण्या यशस्वी झाल्यास पहिले औषध लसीसोबतच प्रतिबंधात्मक म्हणून दिले जाईल.

  • त्याचप्रमाणे, दुसरे औषध कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये विषाणूचा प्रसार होण्यापासून रोखेल.

  • ही औषधे विषाणू ओळखण्यासाठी प्रतिकारशक्तीची क्षमताही वाढवितात

एसीई-२ या संवेदी चेतातंतूवर असलेल्या विशिष्ट रसायनांमुळे ‘सार्स-कोव्ह२’ या विषाणूंचा संसर्ग होऊ शकत नाही. हे रासायनिक संरक्षण ज्यांच्याकडे नसते त्यांच्या संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते.

- प्रा. सुधा राव, वरिष्ठ संशोधक