Transfer of Taxes : केंद्र सरकारचे राज्यांना कर हस्तांतर

केंद्र सरकारने कर हस्तांतरणापोटी राज्यांना आज १ लाख ३९ हजार ७५० कोटी रुपयांचा हप्ता जारी केला.
Transfer of Taxes
Transfer of Taxessakal

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कर हस्तांतरणापोटी राज्यांना आज १ लाख ३९ हजार ७५० कोटी रुपयांचा हप्ता जारी केला.

आज जारी करण्यात आलेल्या हप्त्यानंतर २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी १० जून २०२४ पर्यंत राज्यांना हस्तांतरित करण्यात आलेली रक्कम २ लाख ७९ हजार ५०० कोटी रुपयांवर पोचली आहे. जून २०२४ या महिन्यासाठीच्या नियमित हप्त्याव्यतिरिक्त एक अतिरिक्त हप्ता जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे या महिन्यात वितरित करण्यात आलेली संचित रक्कम १ लाख ३९ हजार ७५० कोटी रुपये झाली आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे राज्य सरकारांना विकास आणि भांडवली खर्चाला चालना देता येईल.

अपेक्षेप्रमाणे उत्तरप्रदेशला सर्वाधिक म्हणजे २५ हजार ०६९.८८ कोटी रुपये मिळाले आहेत. गोव्याला ५३९. ४२ कोटी रुपये मिळाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com