

DGCA taking regulatory action against IndiGo Airlines
esakal
DGCA Imposes Heavy Penalty on IndiGo : मागील महिन्यात इंडिगो एअरलाइन्सने त्यांची हजारो उड्डाणे रद्द केली होती, ज्यामुळे लाखो प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. याप्रकरणी आता डीजीसीएने इंडिगो एअरलाईवर मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणात आज(शनिवार) डीजीसीएने इंडिगोला २२.२ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
याआधी याप्रकरणी डिसेंबरमध्येच डीजीसीएने इंडिगोविरुद्ध मोठी कारवाई करत, त्यांच्या एकूण उड्डाणांमध्ये १० टक्के कपात करण्याचे आदेश दिले होते. तसेच DGCA ने इंडिगोचे सीईओ पीटर अल्बर्स आणि सीओओ इसिड्रे पोरकेरास यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती.
इंडिगोने २ डिसेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत पाच हजारांहून अधिक उड्डाणे रद्द केली होती. एवढंच नाहीतर याव्यतिरिक्त, शेकडो इंडिगो उड्डाणे मोठ्या प्रमाणात विलंबाने चालवली गेली होती. ज्याचा फटका देशभरातील लाखो प्रवाशांना बसला होता आणि इंडिगो विरोधात प्रचंड संतापही व्यक्त झाला होता.
याप्रकरणी जारी केलेल्या निवेदनात, डीजीसीएने म्हटले आहे की इंडिगोविरुद्ध ही कारवाई एअरलाइनच्या ऑपरेशनल बिघाडांच्या आढाव्यानंतर करण्यात आली आहे, ज्यामुळे प्रवाशांना मोठी गैरसोय झाली. डीजीसीएने देशातील सर्वात मोठ्या विमान कंपनीला ६८ दिवसांसाठी दररोज तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे, तसेच इंडिगोला १.८ कोटींचा वेगळा दंडही ठोठावला आहे. ज्यामुळे कंपनीला एकूण २२.२ कोटींचा दंड बसला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.