

A visual representation of EPFO members accessing Provident Fund withdrawals digitally through UPI-based payment platforms, highlighting faster and paperless transactions.
esakal
What Is the New PF Withdrawal via UPI Facility? : नोकरदारवर्ग आणि विशेष करून ज्यांचा पीएफ कट होतोय, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, आता पीएफ खातेधारकांना जेव्हा गरज असेल तेव्हा त्यांना पीएफमधून पैसे काढता येणार आहेत. मात्र यासाठई आता पूर्वीप्रमाणे वेळ लागणार नाही, तर यूपीआय वापर करून पैसे पाठवण्याइतके हे सहज असणार आहे.
ईपीएफओ एक नवीन प्रणाली आणत आहे ज्या अंतर्गत कर्मचारी यूपीआय द्वारे त्यांच्या पीएफ खात्यांमधून थेट पैसे काढू शकतील. ही सुविधा १ एप्रिल २०२६ पासून कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. तसेच, पीएफ प्रणाली पूर्णपणे डिजिटल मोडमध्ये परावर्तित होण्याच्या दिशेने एक नवीन पाऊल ठरणार आहे.
ईपीएफओने सुरू केलेली ही नवीन प्रणाली मोबाइल बँकिंगसारखीच असणार आहे. खातेधारक लॉग इन करू शकतील आणि त्यांच्या खात्यातील शिल्लक रक्कम आणि ते किती रक्कम काढू शकतात ते पाहू शकतील. त्यानंतर ते यूपीआय पर्याय निवडतील आणि त्यांचा यूपीआय पिन वापरून प्रक्रिया पूर्ण करू शकतील.
यानंतर पडताळणी पूर्ण होताच, पैसे थेट लिंक केलेल्या बँक खात्यात जमा होतील. महत्त्वाचे म्हणजे, या प्रक्रियेसाठी कोणतेही चेक, फॉर्म किंवा ऑफलाइन कागदपत्रे आवश्यक राहणार नाहीत. विनंती मंजूर झाल्यानंतर थोड्याच वेळात पैसे खात्यात जमा होतील अशी माहिती आहे.
या बदलासाठी ईपीएफओ त्यांच्या तांत्रिक प्रणालींमध्ये सुधारणा करत आहे. जलद, सुरक्षित आणि अखंड व्यवहार सुनिश्चित करण्यासाठी सध्याचे सॉफ्टवेअर यूपीआय प्लॅटफॉर्मशी जोडले जात आहेत. तसेच, देशभरात अंमलबजावणी करण्यापूर्वी सर्व तांत्रिक त्रुटी दूर केल्या जातील याची खात्री करण्यासाठी कामगार मंत्रालय यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.