55,000 कोटी रुपयांचा कर; ड्रीम-11 सोबत कित्येक ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना DGGI ची नोटीस! काय आहे प्रकरण?

ड्रीम-11 सोबत कित्येक ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना DGGI ने नोटीस पाठवली आहे
dream11
dream11Esakal

GST इंटेलिजेंस डायरेक्टरेट जनरल (DGCI) ने ऑनलाइन रिअल मनी गेमिंग (RMG) कंपन्यांना अंदाजे 55,000 कोटी रुपयांची GST थकबाकी वसूल करण्यासाठी प्री-शो कॉज नोटीस पाठवली आहे. यापैकी, स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म ड्रीम 11 ला 25,000 कोटी रुपयांहून अधिकची जीएसटी नोटीस पाठवण्यात आली आहे, जी कदाचित देशातील सर्वात मोठी अप्रत्यक्ष कर नोटीस आहे.

येत्या आठवड्यात आणखी नोटिसा निघण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. DGGI ने RMG कंपन्यांकडून मागितलेली एकूण GST रक्कम 1 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

कारणे दाखवा नोटीस म्हणजे काय?

मागणी केलेल्या कराची माहिती अधिकार्‍यांनी DRC-01A फॉर्मद्वारे जारी केली आहे. जीएसटीच्या भाषेत याला प्री-शो कॉज नोटीस म्हणतात. कारणे दाखवा नोटीस बजावण्यापूर्वी विभागाकडून ही सूचना केली जाते.

dream11
Supreme Court: ऐतिहासिक! सुप्रीम कोर्टात पहिल्यांदा दिव्यांग वकिलाने केला युक्तिवाद; व्हर्चुअल पद्धतीने पार पडली सुनावणी

Dream11 ची कोर्टात धाव

ड्रीम 11 ने त्यांना बजावलेल्या कारणे दाखवा नोटिसीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे, असे वृत्त Economic Timesने दिले आहे.

dream11
India-Canada: कॅनडामध्ये दहशतवाद्यांना मिळतंय सुरक्षित आश्रय; श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा ट्रुडोंवर आरोप

21,000 कोटींची नोटीस

Dream11 ला पूर्वीची सर्वात मोठी कर मागणी नोटीस 21,000 कोटी रुपयांची होती, जी गेम्सक्राफ्टला पाठवण्यात आली होती. याला कंपनीने सर्वोच्च न्यायालयात विरोध केला होता.

6 सप्टेंबर रोजी न्यायालयाने जीएसटी मागणी रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली. या महिन्याच्या अखेरीस पुढील सुनावणी अपेक्षित आहे. दरम्यान, 16 सप्टेंबर रोजी गेम्सक्राफ्टने त्याचे सुपरअॅप गेमझी बंद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com