Gangs Of Wasseypur: वासेपूर पुन्हा गोळीबाराने हादरले; फहीम खानच्या भावावर दिवसाढवळ्या हल्ला, गँगवॉर पुन्हा भडकणार?

Daylight firing in Wasseypur: दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबारात फहीम खानचा भाऊ शानू खानसह तिघे जखमी; सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध, वासेपूरमध्ये पोलिस बंदोबस्त वाढवला
Gangs Of Wasseypur

Gangs Of Wasseypur

sakal

Updated on

झारखंड: झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील वासेपूर परिसरात सोमवारी दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबाराने खळबळ उडाली. भूली वळणावर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात गँगस्टर फहीम खानचा भाऊ शानू खान याच्यासह तिघे जखमी झाले. जखमींमध्ये एका दुकानमालकाचा आणि बाजारात आलेल्या एका महिलेचा समावेश आहे.

गोळीबारानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com