धनत्रयोदशीदिवशी सोनेखरेदीचा विक्रम; सुमारे 40 टन सोन्याची विक्री

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 November 2020

लोकांनी जवळपास 20 हजार कोटी रुपयांचे सोने यावर्षी धनत्रयोदीशीला खरेदी केल्याचा अंदाज आहे.

मुंबई : धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर यावर्षीच्या सोन्याच्या विक्रीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 30 टक्के वाढ झाली आहे. लोकांनी जवळपास 20 हजार कोटी रुपयांचे सोने यावर्षी धनत्रयोदीशीला खरेदी केल्याचा अंदाज आहे. याबाबतची आकडेवारी इंडिया बुलियन एँड ज्वेलर्स असोशिएशन (आयबीजेए)ने दिली आहे. आयबीजेएच्या आकडेवारीनुसार, देशभरात यावर्षी धनत्रयोदशीला सोन्याची विक्री जवळपास 40 टन झाली आहे. ज्याचे मूल्य जवळपास 12 हजार कोटी रुपये आहे. आयबीजेएचे नॅशनल सेक्रेटरी सुरेंद्र मेहता यांनी सांगितलं की, मागच्या वर्षी फक्त 12 कोटी रुपयांच्या सोन्याची विक्री झाली होती. तर यावर्षी 20 हजार कोटी रुपयांची सोनेविक्री झाली आहे.

हेही वाचा - आत्मनिर्भर भारताची दमदार वाटचाल; भारताकडून पहिल्यांदाच 'ब्रह्मोस मिसाईल'ची निर्यात 

मागच्या वर्षी जवळपास 30 टन सोन्याची विक्री
मेहता यांनी सांगितलं की, मागच्या वर्षी जवळपास 30 टन सोन्याची विक्री झाली होती तर यावर्षी 40 टन सोन्याची विक्री झालीय. त्यांनी म्हटलंय की, सोन्याच्या विक्रीमध्ये 30 ते 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे तसेच मूल्यामध्ये  70 टक्के वाढ झाली आहे. एवढी वाढ कशामुळे याचं उत्तर देताना मेहता यांनी सांगितलंय की गेल्या आठ महिन्यांमध्ये सोन्याचे दागिने खरेदी झालेली नाहीये. लॉकडाऊनमुळे बाजार बंद होता त्यामुळे आता बाजार खुला झाल्यावर लोकांनी धनत्रयोदशीच्या निमित्ताने ही खरेदी केली आहे. जेंव्हा बाजार खुला झाला तेंव्हा लग्नाचा सीझन निघून गेला होता मात्र, आता पुन्हा तो सुरु होतो आहे. लोकांनी या धनत्रयोदशीच्या मुहूर्ताची वाट पाहिली होती. 

हेही वाचा - कंपनीने मोबाईल बदलून देण्यास दिला नकार; स्वत:लाच घेतलं जाळून​

सोन्याची विक्रमी विक्री कशामुळे
त्यांनी म्हटलंय की, यादरम्यान सोन्याचा भाव 56 हजार रुपयांच्या उंचीवर गेला होता. मात्र, आता तो कमी झाला आहे. तसेच ज्वेलर्सनी अनेक मोहात पाडणारे ऑफर्सदेखील दिली आहे त्यामुळे सोने खरेदी विक्रमी झाली. त्यांनी म्हटलं की, धनत्रयोदशी देशात दोन दिवस साजरी केली गेली. काही ठिकाणी लोकांनी ती गुरुवारीच साजरी केली त्यामुळे लोकांना खरेदी करण्यास जास्त वेळ मिळाला. आयबीजेएच्या अनुसार, शुक्रवारी देशभरात सोन्याच्या बाजारात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा सरासरी भाव बिना जीएसटी 50,849 रुपये प्रति ग्रॅम होता. तोच भाव आदल्या दिवशी 50,702 रुपये प्रती 10 ग्रॅम होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: on dhanteras gold worth rs 20000 crore sold in india diwali festival