esakal | आत्मनिर्भर भारताची दमदार वाटचाल; भारताकडून पहिल्यांदाच 'ब्रह्मोस मिसाईल'ची निर्यात 
sakal

बोलून बातमी शोधा

brahmos

भारत आता त्या देशांच्या यादीत जाऊन बसणार आहे जे देश इतर देशांना ताकदवान अशी शस्त्रास्त्रे विकतात.

आत्मनिर्भर भारताची दमदार वाटचाल; भारताकडून पहिल्यांदाच 'ब्रह्मोस मिसाईल'ची निर्यात 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : भारत आतापर्यंत जगभरातील देशांकडून शस्त्रास्त्रे मोठ्या प्रमाणावर खरेदीच करत आला होता. मात्र, असे खूपच कमी देश आहे ज्या देशांना भारताने शस्त्रास्त्रे विकले आहेत. तसेच जी शस्त्रास्त्रे भारताने विकली आहेत ती देखील फारशी ताकदीची आणि खतरनाक अशी नाहीयेत. मात्र, भारत आता त्या देशांच्या यादीत जाऊन बसणार आहे जे देश इतर देशांना ताकदवान अशी शस्त्रास्त्रे विकतात. दक्षिण आशियातील अनेक देश ब्रह्मोस मिसाईल खरेदी करण्यासाठी उत्सुक असलेले दिसून आले आहे. 

हेही वाचा - कंपनीने मोबाईल बदलून देण्यास दिला नकार; स्वत:लाच घेतलं जाळून
मात्र, पुढच्या वर्षी भारत आणि फिलीपाईन्स या करारावर हस्ताक्षर करु शकतील, अशी शक्यता आहे. पुढच्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट यांच्यात एक परिषद होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात ही बैठक होण्याची शक्यता आहे. संरक्षणासह अन्य करारही या बैठकीत होतील. या कराराअंतर्गत फिलीपाईन्स भारताकडून ब्रह्मोस हे मिसाईल खरेदी करणार आहे. ब्रह्मोस हे भारतीय बनावटीचे स्वदेशी मिसाईल आहे. या मिसाईलची निर्मिती भारत आणि रशिया या दोन्ही देशांनी मिळून केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारत आणि रशियाची संयुक्त अशी टीम जी या मिसाईलची निर्मिती करते ती लवकरत फिलीपाईन्सच्या सेनेला ब्रह्मोस मिसाईल देण्याचा करार करेल. डिसेंबर महिन्यात मनीला दौऱ्यात हा करार करण्यात येणार आहे. मनीला दौऱ्यात ही टीम या कराराबाबतच्या बाबी ठरवेल. भारत आणि फिलीपाईन्सच्या दरम्यान इतर अनेक मुद्यांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. 6 नोव्हेंबर रोजी भारत आणि फिलीपाईन्सच्या दरम्यान परराष्ट्र मंत्रालयाची व्हर्च्यूअल मिटींग झाली होती. 

हेही वाचा - Corona Update : देशात शुक्रवारी 44,879 नवे रुग्ण; 24 तासांत 547 कोरोना रुग्णांचा मृत्यू

‘ब्रह्मोस’ हे भारताच्या ताफ्यातील सर्वात घातक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. हवेतून जमिनीवर मारा करणारे ब्रह्मोस हे भारताचे सर्वात घातक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. वॉरहेड वाहून नेण्याची क्षमता असलेले ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र हिंदी महासागरातील चिनी युद्धनौकांना तसेच तिबेट आणि शिनजियांगमधील चीनच्या धावपट्टयांना नेस्तनाबूत करु शकते. 
ब्रह्मोसचे वैशिष्टय म्हणजे सुखोई Su-30 MKI या फायटर जेटमधूनही हे क्षेपणास्त्र डागता येते. त्यामुळे ब्रह्मोसमधून होणारा हल्ला अधिका घातक आहे. चीन बरोबर सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने लडाखमध्येही हे क्षेपणास्त्र तैनात केले आहे, अशी माहिती आहे.