Dheeraj Sahu : नोटबंदीला कडाडून विरोध, आता घरात सापडलं कोट्यवधींचं घबाड; दोन शिफ्टमध्ये मोजले जातायत पैसे

dheeraj sahu opposed demonetization now heavy amount of cash recovered Marathi news crime
dheeraj sahu opposed demonetization now heavy amount of cash recovered Marathi news crime

काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे पाचव्या दिवशीही सुरूच आहेत. आतापर्यंत या छापेमारीत तब्बल ४०० कोटींहून अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे. धीरज साहू यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात दिलेली जुनी विधाने आता व्हायरल होत आहेत. केंद्रातील भाजप सरकारमधील भ्रष्टाचाराविरोधातही त्यांनी वक्तव्य केली होती. आयकर विभागाला त्यांच्याकडे कुबेरचा खजिनाच सापडला आहे. त्यांच्याकडे सापडलेली रोकड मोजताना नोटा मोजणी यंत्रे देखील थकत चालली आहेत.

केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध करताना धीरज प्रसाद साहू म्हणाले होते की, नोटाबंदीबाबत अनेक मोठे दावे करण्यात आले होते, परंतु आता आरबीआयकडून बातमी आली आहे की बँकांकडे पोहोचलेल्या ५०० च्या १०१.९ टक्के आणि २००० च्या ५४.१६ टक्के नोटा बनावट आहेत. या आकडेवारीमुळे सरकारचा दावा उघडा पडला आहे . याशिवाय भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी आणखीही अनेक विधाने केली आहेत.

महत्वाचे म्हणजे कारवाईच्या चौथ्या दिवशी धीरज साहू यांचा फर्म मॅनेजर बंडीयाच्या ओडिशाच्या बोलांगीर च्या सुदापाडा येथील ठिकाणांवर पैशांनी भरलेल्या २० बॅग सापडल्या आहेत. यामध्ये तब्बल १०० कोटी रुयये असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्या मोजण्यासाठी सर्व बॅग्ज बालांगीर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत नेण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून तब्बल ३०० कोटींबून अधिकची रक्कम मोजण्यात आली आहे. तर अजूनही पैशांची मोजणी सुरूच आहे. आतापर्यंत तब्बल ४०० कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.

dheeraj sahu opposed demonetization now heavy amount of cash recovered Marathi news crime
Dheeraj Sahu Tax Raid: धीरज साहूंची 'कुबेर' सारखी संपत्ती मोजणे अद्यापही सुरुच; काँग्रेस म्हणत...

जप्त केल्यानंतर बोलांगीर येथील एसबीआयच्या मुख्य शाखेत जप्त केलेल्या नोटांनी भरलेल्या १७६ पेट्यांची मोजणी सुरू आहे, शुक्रवारपर्यंत १५६ व्या बॅगेची मोजणी सुरू होती. मात्र याबद्दल आतापर्यंत याबद्दल अधिकृतरित्या माहिती देण्यात आली नाहीये.

रोकड मोजण्यासाठी स्टेट बँकेच्या वेगवेगळ्या शाखेतील ५० कर्मचारी नोटांची मोजणी करत आहेत, त्यांना दोन शिफ्टमध्ये नोटा मोजल्या जात आहेत. यासोबतच मोजणीच्या कामात आयकर विभागाचे कर्मचारी देखील उपस्थित आङेत. शुक्रवारी देखील मोजणी दरम्यान अनेक मशिन्स खराब झाल्या होत्या, शनिवारी आणि रविवार सुट्टी असल्याने जास्तीच्या मशिन्स उपलब्ध झाल्या होत्या.

dheeraj sahu opposed demonetization now heavy amount of cash recovered Marathi news crime
दिशा सालियान मृत्यू प्रकरण : SIT चौकशीच्या चर्चेवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले, 'ये डर अच्छा है!'

आयकर विभागाच्या मदतीसाठी हैदराबादहून देकील आयकर कर्मचाऱ्यांची २० सदस्यीय टीम शनिवारी बोलांगीर पोहचली आहे. या टीममध्ये आयकर विभागाचे लिश्र्लेषक देखील आहेत. ही टीम कंपन्यांमध्ये वापरण्यात येत असलेल्या कंप्युटर आणि विविध इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांबद्दल तपास करेल, या तपासात अनेक कागदपत्र मिळण्याची शक्यता आहे.

छापेमारी कुठं-कुठं सुरू आहे?

-बौद्ध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आमि त्याच्याशी संबंधीत परिसर

-बलदेव साहू अँड कंपनीज

-बौद्ध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेडच्या भुवनेश्वर पालसपल्ली येथील कॉर्पोरेट कार्यालय व येथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची घरे

-बौध्द रामचिकाता आणि राणीसती राईस मील

-बालांगीरचे सुदापाडा आणि तितिलागड शहरातील दोन मद्य व्यापाऱ्यांची घरे

-रांची येथील रेडियम रोड आणि लोहरदगा येथिल घर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com