Dhirubhai Ambani Birthday : दत्तगुरुंचीच कृपा समजून धीरुभाईंनी गिरनारच्या पायथ्याला सुरू केला पहिला स्टार्टअप! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhirubhai Ambani

Dhirubhai Ambani Birth Anniversary : दत्तगुरुंचीच कृपा समजून धीरुभाईंनी गिरनारच्या पायथ्याला सुरू केला पहिला स्टार्टअप!

तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तूम्ही स्वतः प्रयत्न केले नाहीत. तर, इतर लोक का करतील. हा विचार आहे देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष धीरूभाई अंबानी यांचा. धीरूभाई अंबानींची गणना अशा उद्योगपतींमध्ये केली जाते. त्यांनी जी स्वप्न पाहिलीत ती पूर्ण केलीत. पण, यशाचा मार्ग सोप्पा नसतो. आज त्यांचे कुटुंब हवी ती गोष्ट विकत घेऊ शकतात. त्यांची स्वप्न पुर्ण करू शकतात ते केवळ धीरूभाईंमुळेच. आज उद्योग जगतात त्यांचे नाव सर्वोच्च स्थानी आहे. आज अशा या महान उद्योजकाचा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने त्यांचा जीवनप्रवास पाहुयात.

धीरजलाल हिरालाल अंबानी उर्फ ​​धीरू भाई यांचा जन्म 28 डिसेंबर 1932 रोजी गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यातील चोरवाड या छोट्या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव हिरालाल अंबानी आणि आईचे नाव जमनाबेन होते. धीरूभाई अंबानी यांचे वडील शिक्षक होते. धीरूभाईंना चार भावंडे होती. धीरूभाईंचे सुरुवातीचे आयुष्य कठीण होते.

हेही वाचा: Heart Care : फिटनेस प्रेमींनो सावधान! प्री वर्कआऊट सप्लीमेंट ठरू शकतात हार्ट अ‍ॅटॅकच कारणं

मोठं कुटुंब असल्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. वडिलांची ढासळलेली तब्येत आणि गरीब आर्थिक परिस्थितीमुळे धीरूभाईंना त्यांचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले. शाळेतील शिक्षकाचा मुलगा असूनही धीरूभाईंचे मन अभ्यासात कमी आणि व्यवसायात जास्त असे. 16 वर्षांच्या धीरूभाईंना समाजवाद आणि राजकारणाने खूप आकर्षित केले.

गिरनार पर्वतावर श्री दत्तगुरूंचे तिर्थस्थान आहे. त्या पर्वतावर जाण्यासाठी १० पायऱ्यांचा टप्पा पार करावा लागतो. असे असले तरी तिथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. तोच विचार करून किशोरवयीन धीरूभाईंनी तिथे त्यांनी एक भजी चहाची टपरी टाकली. घरी वडिलांचा येणारा पगार थांबल्याने या कामातून मिळणारे पैसे त्यांनी घर चालवण्यासाठी दिले. त्यांच्याच कमाईमुळे घराला हातभार लागला.

हेही वाचा: Hardik Pandya : अखेर तो दिवस उजाडला! टीम इंडियात आता हार्दिक नेतृत्व, अनेक वरिष्ठांना निरोपाचा नारळ

पण, दत्तगुरूंच्या मनात काही वेगळेच होते. धीरूभाईंचा हा व्यवसाय कमी काळातच बंद पडला. कारण, त्यांना मोठी झेप घ्यायची होती. त्यांना रिलायन्स उद्योग उभा करायचा होता. त्यामूळेच ते दुकान बंद करून दत्तगुरूंचे आशिर्वाद घेऊन ते परदेशात पोहोचले.

फक्त १६ व्या वर्षी त्यांनी १९५५ मध्ये पहिल्यांदा परदेश दौरा केला. ते भाऊ रमणिकलाल यांच्यासोबत काम करण्यासाठी यमनच्या अदन शहरात पोहचले. अदन याठिकाणी एका पेट्रोल पंपावर सहाय्यक म्हणून धीरुभाईंनी पहिली नोकरी केली. त्याठिकाणी महिन्याला ३०० रुपये पगार मिळत असे. धीरूभाई आबानी नेहमीच मोठा व्यक्ती होण्याचे स्वप्न पाहत असत.

यमनमध्ये काम करत असताना कामगारांना फक्त 25 पैशांना चहा मिळत असे, पण धीरूभाई 25 पैशांनी चहा घेण्याऐवजी एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये 1 रुपयाला चहा प्यायचे. त्या रेस्टॉरंटमध्ये येणार्‍या मोठमोठ्या उद्योगपतींना ऐकता यावे, व्यवसायातील बारकावे समजावेत म्हणून तो असे करत असे.

त्याचवेळी, येमेनच्या स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली, परिस्थिती इतकी बिघडली की येमेनमध्ये राहणाऱ्या भारतीयांना नोकरी सोडावी लागली. अशा परिस्थितीत धीरूभाई अंबानीही नोकरी सोडून भारतात परतले. घरी परतल्यानंतर ते ५०० रुपये घेऊन मुंबईला रवाना झाले. त्यानंतर काही वर्ष मेहनत करून त्यांनी केवळ 50 हजार रुपये भांडवल आणि दोन सहाय्यकांच्या त्यांनी हा व्यवसाय सुरू केला.

आज फक्त मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात रिलायन्स इंडस्ट्रीजची बाजारपेठ ११ लाख कोटींपेक्षा जास्त आहे. त्याच्या कंपनीचे नाव बर्‍याच वेळा बदलले. यापूर्वी रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशन असे नामकरण करण्यात आले जे बदलून रिलायन्स टेक्स्टाईल प्रायव्हेट लिमिटेड व शेवटी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड करण्यात आले.

१९९६ मध्ये रिलायन्स भारतातील अशी पहिली खासगी कंपनी बनली ज्याला एस अँड पी, मूडीज या आंतरराष्ट्रीय पत रेटिंग संस्थांकडून रेटिंग सुरू करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वात रिलायन्स ही वार्षिक महासभा (एजीएम) स्टेडियम असलेली पहिली खासगी कंपनी ठरली. १९८६ च्या अशाच एका एजीएममध्ये साडेतीन लाख लोकांनी भाग घेतला. यानंतर त्यांनी आपला व्यवसाय पेट्रोकेमिकल, टेलिकॉम, एनर्जी, पॉवर अशा अनेक क्षेत्रात विस्तारित केला.

1980 च्या दशकात धीरूभाई अंबानी यांनी पॉलिस्टर फिलामेंट यार्न तयार करण्यासाठी सरकारकडून परवाना घेतला होता. यानंतर धीरूभाई अंबानी यशाच्या शिडीवर चढत राहिले आणि त्यांनी आपल्या करिअरमध्ये कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांनी रिलायन्सचा व्यवसाय जगभर वाढवला. एका खोलीतून सुरू झालेल्या या कंपनीत 2012 सालापर्यंत सुमारे 85 हजार कर्मचारी काम करत होते, जगातील 500 श्रीमंत आणि मोठ्या कंपन्यांमध्ये रिलायन्सचाही समावेश होता. धीरूभाई अंबानी यांचाही आशियातील अव्वल उद्योगपतींच्या यादीत समावेश झाला आहे. व्यवसायाची सर्व जबाबदारी अनिल आणि मुकेश अंबानी यांच्या पदरात टाकून धीरूभाई अंबानी यांचे हृदयविकाराच्या तिव्र धक्क्याने 6 जुलै 2002 रोजी निधन झाले.