Hardik Pandya : अखेर तो दिवस उजाडला! टीम इंडियात आता हार्दिक नेतृत्व; अनेक वरिष्ठांना निरोपाचा नारळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Team India T20 Squad For Sri Lanka Series

Hardik Pandya : अखेर तो दिवस उजाडला! टीम इंडियात आता हार्दिक नेतृत्व, अनेक वरिष्ठांना निरोपाचा नारळ

Hardik Pandya Capetian Team India T20 Squad For Sri Lanka Series : अखेर बीसीसीआयने टी 20 वर्ल्डकपच्या पराभवानंतर नव्या दमाचा टी 20 संघा तयार करण्यास सुरूवात केली. श्रीलंकेविरूद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याच्या हातात देण्यात आले आहे. तर रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुलसह ऋषभ पंतचा देखील टी 20 संघातून पत्ता कट झाला आहे.

हेही वाचा: Rohit Sharma : वनडेत रोहितचे कर्णधारपद वाचले, मात्र केएल राहुलचे झाले डिमोशन

आशिया कपनंतर टी 20 वर्ल्डकपमध्ये देखील भारताच्या पदरी निराशा पडली होती. त्याचवेळी भारतीय टी 20 संघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी बीसीसीआयने कंबर कसली. अखेर आज श्रीलंका मालिकेपूर्वी बीसीसीआयने भारताचा नवा टी 20 संघ कसा असेल याची झलक दाखवली.

हेही वाचा: केएल राहुल संघातील स्थान अन् उपकर्णधरापदालाही मुकला; श्रीलंकेविरोधात 'अशी' असेल टीम इंडिया

बीसीसीआयने टी 20 संघाचे नेतृत्व पहिल्याच प्रयत्नात गुजरात टायटन्सला आयपीएल टायटल जिंकून देणाऱ्या हार्दिककडे सोपवले. जरी बीसीसीआयने रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली असल्याचे कारण दिले असले तरी ही विश्रांती सक्तीची असून जवळपास या वरिष्ठ खेळाडूंची टी 20 संघातून अघोषित घरवापसी झाली आहे.

हेही वाचा: Virat Kohli : ठरलं तर मग! विराट कोहली टी 20 मधूनच घेणार ब्रेक; आता IPL 2023...

दुसरीकडे टी 20 आणि वनडे संघातून ऋषभ पंतचा देखील पत्ता कट झाला असून त्याच्या जागी आता संजू सॅमसन आणि इशांत किशन यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एका वर्षापूर्वीच भारतीय संघात पादर्पण करणाऱ्या सूर्यकुमार यादवला भारतीय टी 20 संघाचे उपकर्णधारपद देऊन त्याच्या कामगिरीचा एकप्रकारे बीसीसीआयने गौरवच केला आहे.