Dhruv Rathee
esaka
यूट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ध्रुव राठी याच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. आठ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या मानहानीच्या प्रकरणात दिल्लीतील न्यायालयाने त्यांच्या विरोधात नव्याने जामीनपात्र वॉरंट जारी केले आहेत. यापूर्वी पाठवलेले वॉरंट चुकीच्या पत्त्यावर गेल्याने त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. त्यामुळे न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.