

Diabetic Foot ai research kanpur IIT
esakal
कानपूर:मधुमेहामुळे पायांमध्ये गंभीर जखमा होणे, संसर्ग वाढणे आणि काही प्रकरणांत पाय कापण्याची वेळ येणे, ही एक गंभीर वैद्यकीय समस्या आहे. या समस्येचे लवकर निदान करण्यासाठी कानपूरमधील गणेश शंकर विद्यार्थी मेमोरियल (GSVM) मेडिकल कॉलेज आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) कानपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित मॉडेल विकसित करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या मॉडेलच्या मदतीने रुग्णांच्या पायातील रक्तपुरवठा, नसांची स्थिती आणि रक्तातील साखरेशी संबंधित वैद्यकीय माहितीचे विश्लेषण करून गुंतागुंतींचा धोका ओळखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या संशोधनाच्या प्राथमिक टप्प्यात २२० रुग्णांची निवड करण्यात आली आहे. रुग्णांच्या वैद्यकीय तपासण्या, नियमित पाठपुरावा आणि संकलित माहितीच्या आधारे एआय मॉडेलला प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर मॉडेलने वर्तवलेल्या निष्कर्षांची डॉक्टरांच्या निदानाशी तुलना करून त्याची अचूकता तपासली जाईल.