esakal | जगात या आजारामुळे दर 10 सेकंदाला होतोय एकाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

diabetes

जगात मधुमेह सातव्या क्रमांकाचे मृत्यूचे कारण असून रस्ते अपघातांपेक्षा मधुमेहामुळे अधिक मृत्यू होतात. त्यामुळे, मधुमेहाचे मोठे आव्हान जगासमोर आहे.

जगात या आजारामुळे दर 10 सेकंदाला होतोय एकाचा मृत्यू

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अहमदाबाद - जगभरात दर सहा सेकंदाला एका व्यक्तीचा मधुमेहामुळे मृत्यू होतो. जगात मधुमेह सातव्या क्रमांकाचे मृत्यूचे कारण असून रस्ते अपघातांपेक्षा मधुमेहामुळे अधिक मृत्यू होतात. त्यामुळे, मधुमेहाचे मोठे आव्हान जगासमोर आहे.

साधारपणे मधुमेहाचे ९०% रुग्ण दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहाचे असतात. त्यांच्या शरीरात चरबीचे प्रमाण अतिरिक्त असते. त्यामुळे, मधुमेह व लठ्ठपणाचा संबंधही अधोरेखित होतो. त्याचप्रमाणे, मधुमेहाबरोबर जगणेही महाग ठरू शकते. उदा. सामान्य वजनाची मधुमेह नसलेली व्यक्ती आरोग्यावर दरवर्षी एक हजार रु. खर्च करत असेल तर मधुमेहाच्या रुग्णाचा हाच खर्च चार हजारांपेक्षा अधिक होतो. नियमित औषधे, चाचण्या आदींमुळे हा खर्च वाढतो. त्याचप्रमाणे, हा खर्च आजाराची तीव्रता आणि गुंतागुंतीबरोबर वाढत जातो. परिणामी, मधुमेहाच्या अनेक रुग्णांमध्ये असहाय्यतेची भावना विकसित होते.

हे वाचा - हृदय रुग्णांनो, थंडीत आरोग्य सांभाळा! रक्तप्रवाहात अडथळ्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा इशारा

जुन्या आजाराबद्दलचा नवा दृष्टिकोन
मधुमेहावर उपचार करताना आहारात सुधारणा,व्यायाम आदींची मदत घेतली जाते. मात्र, ते अपुरे ठरत असल्याने इन्शुलिनचा आधार घेतला जातो. मात्र, अनेकांमध्ये तेही तात्पुरते ठरू शकते. मधुमेहावरील सध्याची आधुनिक औषधेही आजारातील गुंतागुंत नियंत्रित करण्यात अपुरी ठरतात. १९८० च्या सुमारास डॉक्टरांना लठ्ठपणा कमी करण्यासाठीची बॅरिॲट्रिक शस्त्रक्रिया मधुमेहावर मात करण्यातही उपयुक्त असल्याचे आढळले. तेव्हापासून लठ्ठपणा कमी करून मधुमेहावर मात करण्याचे प्रयत्न केले गेले.

साधारण १५ वर्षांच्या संशोधनातून बॅरिॲट्रिक शस्त्रक्रिया झालेल्या १,३५,२४६ रुग्णांपैकी ७८ टक्के रुग्णांना मधुमेहापासून पूर्णपणे मुक्ती मिळाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे, लठ्ठपणावर मोकळेपणाची बोलण्याची गरज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

हे वाचा - हिवाळ्यात आजाराने बेजार व्हायचे नसेल तर हे पाच पदार्थ खाणे टाळा

महिलांपेक्षा पुरुषांना अधिक धोका
पुरुषांना महिलांपेक्षा मधुमेहाची शक्यता अधिक असते. मात्र, महिलांना मधुमेहामुळे हदयविकार, नैराश्य आदींचा त्रास अधिक होऊ शकतो. तर पुरुषांना नपुसंकतेचा सामना करावा लागू शकतो. मधुमेहाच्या एकूण रुग्णांपैकी जवळपास ७५% रुग्णांमध्येही समस्या उद्‌भवते.